esakal | सलमानचा बॉडीगार्ड 'शेरा'ला मिळतो इतका पगार
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan bodyguard Shera

सलमानचा बॉडीगार्ड 'शेरा'ला मिळतो इतका पगार

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता सलमान खानचा Salman Khan बॉडीगार्ड शेरा Shera हा नेहमीच चर्चेत असतो. १९९४ पासून सलमानसाठी काम करत असलेला शेरा आता त्याच्या कुटुंबातील एक सदस्यच झाला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सलमान कुठेही गेला तरी शेरा त्याच्यासोबत त्याच्या सावलीसारखा असतो आणि त्याची रक्षा करतो. सलमानचा बॉडीगार्ड Salman Bodygaurd बनून शेराला तब्बल २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. 'जब तक जिंदा रहुंगा, भाई के साथ रहुंगा' अशी शपथच शेराने घेतली आहे. १९९४ मध्ये सलमानचा भाऊ सोहैल खानने शेराचा इंटरव्ह्यू घेतला होता. त्यानंतर तो सलमानचा बॉडीगार्ड म्हणून आजवर काम करतोय. (Salman Khan bodyguard Shera salary amount will blow your mind)

आज स्वत: शेरा कोणा सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. शेराने अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींच्या बॉडीगार्डचं काम केलंय. प्रसिद्ध गायक जस्टिन बिबर जेव्हा भारतात आला होता, तेव्हा शेराच त्याचा बॉडीगार्ड बनला होता. या शेराला पगार किती मिळत असावा, असा प्रश्न आजवर अनेकांना पडला असेल. तर शेराला प्रत्येक महिन्याला १५ लाख रुपये म्हणजेच वर्षाला जवळपास दोन कोटी रुपये मिळतात.

हेही वाचा : "कोव्हिडमुळे नाही तर अपुऱ्या सुविधांमुळे भावंडांचे प्राण गेले"; प्रियांका चोप्राच्या बहिणीचा संताप

शेराचं खरं नाव गुरमित सिंग जॉली असं आहे. "आज मी जे काही आहे ते सलमानमुळे आहे", असं शेरा एका मुलाखतीत म्हणाला होता. सलमानने त्याचा 'बॉडीगार्ड' हा चित्रपट शेराला समर्पित केला होता.

loading image
go to top