Salman Khan : शेजाऱ्याविरोधात सलमानची हायकोर्टात धाव; खानची तुलना केली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan Latest News

Salman Khan : शेजाऱ्याविरोधात सलमानची हायकोर्टात धाव; खानची तुलना केली...

Salman Khan Latest News बॉलिवूड अभिनेता सलमान खानने (Salman Khan) पनवेल फार्महाउस शेजारी केतन कक्करविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘केतनने त्याच्याबद्दल शेअर केलेला व्हिडिओ केवळ बदनामीकारक नाही तर सांप्रदायिक चिथावणी देणारा आहे’ असा सलमान खान म्हणतो. ‘व्हिडिओमध्ये केतनने सलमान खानची तुलना बाबर (Babur) आणि औरंगजेबशी (Aurangzeb) केली आहे’ असे सलमानच्या वकिलाने सांगितले.

न्यायमूर्ती सीव्ही भडंग यांच्या एकल खंडपीठासमोर खान यांच्या अपीलावर सुनावणी सुरू आहे. सलमानने दिवाणी न्यायालयाच्या मार्च २०२२ च्या आदेशाला आव्हान देत हे अपील दाखल केले आहे. केतन कक्करविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात दिवाणी न्यायालयाने सलमान खानला दिलासा देण्यास नकार दिला होता.

केतन कक्करविरुद्ध दाखल केलेला खटला हा सलमान खानच्या (Salman Khan) पनवेल फार्महाउसवर खानच्या बेकायदेशीर हालचालींबद्दल सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओशी संबंधित आहे. कक्कर यांना बदनामीकारक व्हिडिओ काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत आणि यापुढे अशी टिप्पणी करणे थांबवावे, अशी विनंती सलमान खानने न्यायालयाला केली होती. दुसरीकडे दिवाणी न्यायालयाने असा कोणताही आदेश देण्यास नकार दिल्याने सलमानने उच्च न्यायालयात धाव घेतली.

हेही वाचा: भाजप नेत्याचा चक्क अभिनेत्याला सल्ला; आमिर खान, बॉलिवूडला उद्देशून म्हणाले...

शुक्रवारी सलमान खानचे वकील रवी कदम यांनी दिवाणी न्यायालयाचा आदेश चुकीचा असल्याचा युक्तिवाद केला. कक्कर यांनी अपलोड केलेला व्हिडिओ वादग्रस्त आहे. ते केवळ बदनामीकारक नाहीत तर सलमान खानच्या विरोधात पाहणाऱ्यांना जातीय चिथावणी देतात, असे रवी कदम यांचे म्हणणे आहे. सलमान खान कसा फार्महाउसजवळील गणेश मंदिर बळकावण्याचा प्रयत्न करीत होता याबद्दल कक्कर बोलले होते.

सलमानची बाबर, औरंगजेबशी तुलना

व्हिडिओमध्ये कक्कर यांनी सलमान खानची बाबर (Babur) आणि औरंगजेबशी (Aurangzeb) तुलना केली. अयोध्येत मंदिर बांधायला ५०० वर्षे लागली आणि सलमान खान येथील गणेश मंदिर बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिले. हे स्पष्टपणे सलमानच्या विरोधात भडकवण्यासाठी आहे. व्हिडिओने प्रत्येक गोष्टीला जातीय रंग देऊन हिंदू विरुद्ध मुस्लिम बनवले, असे वकील रवी कदम यांचे म्हणणे आहे.

केतन कक्कर काय म्हणाले...

सलमान खानचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप केतन कक्करने केला आहे. यावर कदम म्हणाले, ‘सलमानवर अमली पदार्थांची तस्करी, मानवी अवयवांची तस्करी आणि फार्महाउसमधून मुलांची तस्करी केल्याचा आरोप कक्करने केला आहे.’ या प्रकरणातील संक्षिप्त युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने पुढील सुनावणी २२ ऑगस्टला निश्चित केली आहे. कक्कर यांनी वकील आभा सिंग व आदित्य सिंग यांच्यामार्फत ट्रायल कोर्टात दावा केला होता की, अभिनेत्याने कक्करला जमीन सोडण्यासाठी दबाव आणण्यासाठी मानहानीचा दावा दाखल केला होता.

Web Title: Salman Khan Bollywood Actor Highcourt Babur Aurangzeb

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..