फराझ खानच्या मदतीला धावला सलमान खान, चाहत्यांनी भाईजानचं केलं कौतुक

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 15 October 2020

वेगवेगळ्या मार्गांनी गरजूंच्या मदतीसाठी पुढं सरसावणाऱ्या या कलाकारांच्या यादीतलं एक महत्वाचं नाव म्हणजे अभिनेता सलमान खान. सलमाननं पुन्हा एकदा त्याच्या दानशूरपणाचा दाखला दिल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई : बॉलीवूडमध्ये नावारुपास आलेले अनेक सेलिब्रिटी हे चाहत्यांमध्ये त्यांच्या दिलखुलास अंदाजासाठी आणि गरजूंना वेळोवेळी मदत करण्यासाठीही ओळखले जातात. वेगवेगळ्या मार्गांनी गरजूंच्या मदतीसाठी पुढं सरसावणाऱ्या या कलाकारांच्या यादीतलं एक महत्वाचं नाव म्हणजे अभिनेता सलमान खान. सलमाननं पुन्हा एकदा त्याच्या दानशूरपणाचा दाखला दिल्याचं पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा: रोहित शेट्टीच्या आगामी सिनेमातरणवीर सिंह आणि जॅकलीन फर्नांडिस ही जोडी झळकणार?   

अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या 'मेहंदी' या चित्रपटातून तिच्या पतीच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेता फराज खान याच्या मदतीसाठी सलमान पुढे आला आहे. फराज सध्या बंगळुरू येथील एका रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ब्रेन इन्फेक्शननंतर त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचं कळतंय.

फराजच्या कुटुंबानं ऑनलाइन फंडसाठी सर्वांनाच आवाहनही केलं आहे. ज्यावर आता सलमाननंच मदतीचा हात पुढं केला आहे. फराजच्या आजारपणाबाबत कळताच अभिनेत्री पूजा भट्ट हिने त्याच्या मदतीसाठी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यानंतर आता अभिनेत्री कश्मीरा शाह हिनं एक पोस्ट लिहित सलमाननं फराजसाठीच्या सर्व बिलांची रक्कम भरल्याची माहिती दिली. सलमाननं केलेल्या या मदतीची माहिती समोर येताच चाहत्यांनी पुन्हा एकदा भाईजानची प्रशंसा करण्यात सुरुवात केली आहे.

'तू खरंच एक महान व्यक्ती आहेस. फराजवरील उपचारांची बिलं भरण्यासाठी, त्याला आर्थिक मदत करण्यासाठी तुझे खूप आभार', असं कश्मीरानं सलमानचा एक फोटो पोस्ट करत त्यासोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.

सूत्रांच्या माहितीनुसार फराज मागील पाच दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर (स्नायु विकार) या आजारामुळं त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. फराजचा भाऊ फहमान खान याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या उपचारासाठी जवळपास २५ लाख रुपये इतक्या रकमेची गरज आहे.

salman khan came forward to help faraz khan admitted in icu paid all hospital bills 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salman khan came forward to help faraz khan admitted in icu paid all hospital bills