Salman 34 Years In Bollywood: 'किसी का भाई,किसी की जान..' सलमानची पोस्ट चर्चेत Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan Celebrates 34 Years In Cinema: "Thank You For Being With Me," He Writes

Salman 34 Years In Bollywood: 'किसी का भाई,किसी की जान..' सलमानची पोस्ट चर्चेत

Salman Khan 34 years in bollywood: बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानने करिअरची ३४ वर्ष इंडस्ट्रीत पूर्ण केली आहेत. २२ ऑगस्ट १९८८ साली सलमान खानचा सिनेमा 'बीवी हो तो ऐसी' रिलीज झाला होता. यावर्षी तब्बल ३४ वर्ष दबंग खानला बॉलीवूडमध्ये झाली आहेत. या ३४ वर्षात सलमान खानने बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. या खास क्षणी सलमान खाननं सोशल मीडियावर खूप मोठी गोष्ट बोलून दाखवली आहे.(Salman Khan Celebrates 34 Years In Cinema: "Thank You For Being With Me," He Writes)

हेही वाचा: Boycott Sholey : माइलस्टोन 'शोले' बॉयकॉट गॅंगच्या निशाण्यावर, काय आहे प्रकरण?

ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहित आहे की,सलमान खानला बॉक्सऑफिसचा 'सुलतान' म्हटलं जातं. बॉक्सऑफिसवर २०० करोडच्या बिझनेस करणाऱ्या सिनेमांचा मोठा रेकॉर्ड सलमानच्याच नावावर आहे. तर सलमान खान हा एकमेव कलाकार आहे ज्याच्या नावावर १०० करोडची कमाई करणारे सिनेमे सर्वात जास्त संख्येने आहेत. हा सलमान खानचा स्टारडमच आहे ज्यामुळे त्याच्या सिनेमानं १००-१५० करोड कमावले तरी ते त्याच्यासाठी कमीच लेखले जातात. कारण सिनेमाची बंपर कमाई करण्यात त्याचा हातखंडा आहे असं म्हटलं जातं.

यादरम्यान ३४ वर्षांच्या सिने-करिअरविषयी सलमान खानने नुकताच ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याच्या सुरुवातीला सलमान खानने लिहिले आहे की,'' ३४ वर्षापूर्वी आणि आज ३४ वर्षानंतरही...प्रवास सुरु आहे. माझ्यासोबत राहण्यासाठी धन्यवाद''. एवढंच नाही तर व्हिडीओ शेअर करत त्यानं त्याला कॅप्शन दिलं आहे की,''किसी का भाई,किसी की जान''.

हेही वाचा: 'Jai Bhim' पुन्हा कायद्याच्या कचाट्यात, आता साऊथ स्टार सूर्याच्या विरोधात FIR

सलमान आपल्या हटके अंदाजासाठी नेहमीच ओळखला जातो. त्यामुळे जेव्हा त्याने 'किसी का भाई,किसी की जान' असं त्याने म्हटल्यानंतर याची भलतीच चर्चा ट्वीटरवर रंगली आहे. कोण म्हणतंय, हे त्याच्या पुढच्या सिनेमाचं टायटल असू शकतं. म्हणजे 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमाचं,जे टायटल बदलणार आणि 'भाईजान' होणार अशी चर्चा होती. सलमानने पोस्ट केलेल्या व्हिडीओतील त्याचा लूकही पाहून लोक म्हणतायत हा लूक देखील 'भाईजान' सिनेमातला आहे.

Web Title: Salman Khan Celebrates 34 Years In Cinema Thank You For Being With Me He

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..