KRK विरोधात सलमानने केला मानहानीचा दावा; 'राधे'वर टीका करणं पडलं महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan KRK

KRK विरोधात सलमानने केला मानहानीचा दावा; 'राधे'वर टीका करणं पडलं महागात

'ईद'च्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या Salman Khan 'राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई' Radhe : Your Most Wanted Bhai या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. या चित्रपटामुळे सलमानला सोशल मीडियावर ट्रोलही केलं गेलं. 'राधे'वरील बरेच मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्या लोकांना सलमानचा हा चित्रपट अजिबात आवडला नाही, त्यात कमाल आर खानचंही Kamal R Khan नाव आहे. केआरकेने KRK त्याच्या रिव्ह्यूमध्ये 'राधे' चित्रपटावर खूप टीका केली होती. त्याविरोधात आता सलमानने मानहानीचा दावा केला आहे. (Salman Khan Files Defamation Complaint Against Actor KRK for His Radhe Review)

केआरकेने स्वत: ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. 'सलमान खानने मी केलेल्या राधेच्या रिव्ह्यूविरोधात मानहानीचा दावा केला आहे. आता मी सलमानच्या कोणत्याच चित्रपटाचा रिव्ह्यू करणार नाही', असं त्याने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं. 'जर एखाद्या निर्मात्याने किंवा अभिनेत्याने आग्रह केल्यास मी त्याच्या चित्रपटाचा रिव्ह्यू करत नाही हे मी आधीही खूप वेळा सांगितलंय. सलमानने मी केलेल्या राधेच्या रिव्ह्यूविरोधात मानहानीचा दावा केला म्हणजे त्याच्यावर त्याचा खूपच परिणाम झाला असेल. त्यामुळे यापुढे मी त्याच्या चित्रपटांचे समिक्षण करणार नाही. आज माझा शेवटचा व्हिडीओ मी पोस्ट करेन', असं त्याने पुढे स्पष्ट केलं.

'राधे' या चित्रपटाचं दिग्दर्शक प्रभूदेवाने केलं असून यामध्ये दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.

टॅग्स :salman khanKRK