मराठी अभिनेत्याची एक्स्प्रेस वेवर लूट; ५० हजार रुपये घेऊन आरोपी पसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogesh Sohoni

मराठी अभिनेत्याची एक्स्प्रेस वेवर लूट; ५० हजार रुपये घेऊन आरोपी पसार

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' Mulgi Zali Ho या मालिकेतील अभिनेता योगेश सोहोनीला Yogesh Sohoni मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर Mumbai Pune Express way लुटलं. ८ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास एक्स्प्रेस वेवर सोमाटणेजवळ ही घटना घडली. एका एसयुव्ही चालकाने योगेशकडे असलेले ५० हजार रुपये लुटल्याचा आरोप आहे. काही कामानिमित्त योगेश हा मुंबईहून पुण्याला जात होता, त्यावेळी ही घटना घडली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे भागातील शिरगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. (SUV driver robs Marathi TV actor Yogesh Sohoni of rupees 50k on express way)

नेमकं काय घडलं?

एक्स्प्रेस वेवर योगेश गाडी चालवत असताना त्याच्या मागून एक एसयूव्ही आली. त्या गाडीचालकाने हात दाखवून योगेशला थांबण्यास सांगतलं. "तुझ्या गाडीमुळे माझ्या कारचा अपघात झाला. त्यात एक जण जखमी झाला आहे. या घटनेची तक्रार पोलिसांत द्यायची नसेल तर तू मला सव्वा लाख रुपये दे. नाहीतर मी तुला पोलिसांकडे घेऊन जाईन", अशी धमकी संबंधित कारचालकाने योगेशला दिली. सोमाटणे फाट्याजवळील एका एटीएममधून त्याने योगेशकडून बळजबरीने ५० हजार रुपये काढून घेतले आणि ती रक्कम घेऊन तो पसार झाला. या संपूर्ण घटनेनंतर योगेशला समजलं की मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर कोणताच अपघात झाला नव्हता.

हेही वाचा : अभिनेत्रीचं पोस्टर पाहून हरभजन 'क्लीन बोल्ड'; वाचा भन्नाट किस्सा

"आम्हाला एक्स्प्रेस वेवरील सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत आणि अभिनेत्याने आरोपींची ओळख पटवली आहे", अशी माहिती पोलिसांनी दिली. रविवारी सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर सोमवारी योगेशने एफआयआर दाखल केली.

योगेश सध्या 'मुलगी झाली हो' या मालिकेत शौनक जहागिरदारची भूमिका साकारत आहे. याआधी त्याने 'अस्मिता' या मालिकेतही काम केलं होतं. त्याचप्रमाणे 'ड्राय डे' या चित्रपटातही तो झळकला होता.

Web Title: Suv Driver Robs Marathi Tv Actor Yogesh Sohoni Of Rupees 50k On Express

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top