Salman Khan ‘Josh’ : भारतीय नौदलासोबत घालवला दिवस; सैनिकासाठी तयार केल्या पोळ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan Latest News

Salman Khan ‘Josh’ : भारतीय नौदलासोबत घालवला दिवस; सैनिकासाठी तयार केल्या पोळ्या

Salman Khan Latest News बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या विशाखापट्टणममध्ये आहे. तो त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तिथे गेला होता. विशाखापट्टणममधील सलमान खानचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तो भारतीय नौदलाच्या (Indian Navy) मध्यभागी दिसत आहे. सलमान खानने आपला दिवस नौदलाच्या जवानांसोबत घालवला आणि त्यांच्यासोबत खूप मस्ती केली. या फोटोंना अभिनेत्याच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सलमान खानचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सलमान खान नौदलाच्या जवानांमध्ये दिसत आहे. त्याने पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली आहे. यासोबतच त्याने भारतीय नौदलाची (Indian Navy) टोपीही घातली आहे. तिरंगा घेऊन सलमान खान (Salman Khan) जवानांसोबत मस्ती करीत आहे. फोटोंमध्ये नौदलाचे जवान आणि सलमान खान एकत्र नाचताना दिसत आहेत.

दुसऱ्या एका छायाचित्रात सलमान खान नौदलाच्या जवानांसाठी पोळी बनवताना दिसत आहे. अभिनेत्याचे हे फोटो सोशल मीडियावर (Social media) चांगलेच व्हायरल होत आहेत. सलमान खानच्या चाहत्यांना सलमानचे फोटो खूप आवडतात. एका चाहत्याने कमेंट करीत ‘जय हो’ लिहिले.

दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘सर्व सुपरस्टार एकत्र.' तिसऱ्याने लिहिले, ‘भाई अभिमान आहे’ सलमान खानच्या अनेक चाहत्यांनी भारतीय नौदलाच्या जवानांसोबत वेळ घालवल्याबद्दल कमेंट करीत कौतुक केले आहे. सलमान खान लवकरच ‘टायगर ३’ या चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: Salman Khan Indian Navy Soldiers Social Media Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..