कथा चांगली हवी! 

तेजल गावडे  
शुक्रवार, 9 जून 2017

"ट्युबलाईट'ची कल्पना... 
सलमान खान "ट्युबलाईट' चित्रपट 2015 साली प्रदर्शित झालेला "लिटील बॉय' या हॉलीवूडपटातून प्रेरणा घेऊन बनविलेला आहे. दिग्दर्शक कबीर खानने "लिटील बॉय' हा चित्रपट पाहिला आणि त्यांना हा चित्रपट खूपच भावला. त्यात वडील आणि मुलाचं नातं दाखवण्यात आलेलं आहे. तसंच त्यांनी एक जाहिरात पाहिली आणि त्यांना ही कल्पना सुचली. मग "ट्युबलाईट'ची कथा आणि पटकथा लिहिली गेली. 

"ट्युबलाईट'ची कल्पना... 
सलमान खान "ट्युबलाईट' चित्रपट 2015 साली प्रदर्शित झालेला "लिटील बॉय' या हॉलीवूडपटातून प्रेरणा घेऊन बनविलेला आहे. दिग्दर्शक कबीर खानने "लिटील बॉय' हा चित्रपट पाहिला आणि त्यांना हा चित्रपट खूपच भावला. त्यात वडील आणि मुलाचं नातं दाखवण्यात आलेलं आहे. तसंच त्यांनी एक जाहिरात पाहिली आणि त्यांना ही कल्पना सुचली. मग "ट्युबलाईट'ची कथा आणि पटकथा लिहिली गेली. 

"ट्युबलाईट' चित्रपटाबद्दल... 
या चित्रपटाची कथा भारत आणि चीन यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवर आधारित आहे. या चित्रपटात मी लक्ष्मणची भूमिका साकारली आहे, तर सोहेलनं भरत नामक माझ्या लहान भावाची भूमिका केली आहे. युद्धाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही भाऊ भारतीय सैन्यात दाखल होण्यासाठी जातात. यात भरतची निवड होते. त्यानंतर युद्धाच्या दरम्यान भरत गायब होतो आणि मी त्याच्या शोधात बाहेर पडतो, अशी थोडक्‍यात या सिनेमाची कथा आहे. 

निर्मिती करताना... 
मी एका लेखकाचा मुलगा आहे. त्यामुळे कथा आणि पटकथेचा जास्त विचार करतो. कथेपेक्षा मी दुसऱ्या कशालाही जास्त महत्त्व देत नाही. चांगली कथा असेल तर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतो. हल्लीचा प्रेक्षकवर्ग खूप हुशार झाला आहे. त्यामुळे त्यांना काहीही देऊन चालत नाही. 

भूमिकेची तयारी... 
महेश मांजरेकर माझे खूप चांगले मित्र आहेत. त्यांचा मुलगा सत्या. तो खूपच निरागस आहे; पण तो तितकाच हुशारदेखील आहे. त्याच्याकडून मी चेहऱ्यावर निरागसता कशी असली पाहिजे, याचं निरीक्षण केलं. त्यानंतर माझा बॉडी डबल परवेझ. तोही खूप साधा आणि चांगला मुलगा आहे. या दोन व्यक्तींना मी माझ्या डोळ्यांसमोर ठेवलं आणि माझ्या शैलीने "ट्युबलाईट'मधील लक्ष्मण हे पात्र साकारलं. 

सोहेल आणि मी... 
सोहेल माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मापासूनच सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत. या चित्रपटात त्याने माझ्या लहान भावाची भूमिका साकारलीय. त्यामुळे या चित्रपटाचा प्रवास खूप भावूक होता आणि चित्रपटाच्या काही दृश्‍यांच्या चित्रीकरणावेळी मी खूप हळवा झालो होतो. 

दिग्दर्शक कबीर खानसोबतचा अनुभव... 
माझा कबीर खानसोबतचा हा तिसरा चित्रपट आहे. एखाद्या दिग्दर्शकासोबत पुन्हा काम करताना एक कम्फर्ट मिळतो. पहिल्यांदा काम करीत असताना त्यांच्या कामाची पद्धत काय आहे किंवा माझ्या कामाची पद्धत हे एकमेकांना माहीत नसतं; पण या गोष्टींचा अंदाज दोघांना एडिट करताना येतो. मग दुसऱ्या चित्रपटावेळी एकमेकांमध्ये खूप चांगलं ट्युनिंग निर्माण झालेलं असतं. 

झू झू चांगली अभिनेत्री... 
चिनी अभिनेत्री झू झू सोबत काम करायला खूप मजा आली. ती खूप प्रोफेशनल आहे आणि शांत स्वभावाची आहे. ती खूपच चांगली अभिनेत्री आहे. 

किंग खान महत्त्वपूर्ण भूमिकेत... 
शाहरूख खान या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे; पण त्याची भूमिका या चित्रपटात खूप महत्त्वपूर्ण आहे. त्याची चित्रपटात एन्ट्री होते तेव्हा चित्रपट महत्त्वाचं वळण घेतो. 

"ट्युबलाईट'नंतर... 
"ट्युबलाईट' चित्रपटानंतर "टाइगर जिंदा है' चित्रपट येणार आहे. त्यात मी जबरदस्त ऍक्‍शन करताना दिसणार आहे. त्यानंतर मी एक डान्सिंग फिल्म करतोय. ज्याचं दिग्दर्शन रेमो डिसुझा करतोय आणि यात जॅकलिन फर्नांडिस आहे. तसंच "दबंग 3'चा सिक्वेल येणार आहे. त्याचबरोबर रितेश देशमुखच्या आगामी चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. तसंच संजय लीला भन्साळींच्या चित्रपटातही काम करणार आहे. 

Web Title: salman khan interview