esakal | सलमान खानचा ड्रायव्हर आणि दोन कर्मचा-यांना कोरोनाची लागण, सलमानने स्वतःला केलं आयसोलेट
sakal

बोलून बातमी शोधा

salman khan

सलमान खान सध्या खूप बिझी आहे आणि 'बिग बॉस १४' होस्ट करतोय. तेव्हा आता सलमान खान येणा-या काही एपिसोड्समध्ये दिसणार की नाही याबाब अजुन अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

सलमान खानचा ड्रायव्हर आणि दोन कर्मचा-यांना कोरोनाची लागण, सलमानने स्वतःला केलं आयसोलेट

sakal_logo
By
दिपाली म्हात्रे

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा ड्रायव्हर आणि दोन कर्मचारी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. ड्रायव्हर आणि कर्मचा-यांबद्दल ही माहिती मिळताच सलमान खानने स्वतःला आयसोलेट केलं आहे. सलमान खान सध्या खूप बिझी आहे आणि 'बिग बॉस १४' होस्ट करतोय. तेव्हा आता सलमान खान येणा-या काही एपिसोड्समध्ये दिसणार की नाही याबाब अजुन अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  

हे ही वाचा: कपिल शर्माने 'या' कारणासाठी केलं 11 किलो वजन कमी, 'बिहाईंड द सीन्स' व्हिडिओमध्ये झाला खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानची गाडी चालवणा-या ड्रायव्हरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचा-यांची देखील तपासणी केली गेली. त्यानंतर सलमान खानच्या कर्मचा-यांमध्ये दोनजण पॉझिटीव्ह आढळून आले. याबाबतची माहिती मिळताच सलमानने स्वतःला आयसोलेट केल्याचं सांगितलं जातंय. या दरम्यान सलमान खान कोणालाही भेटत नाहीये.

सलमान सध्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. यासोबतंच तो 'बिग बॉस १४' हा रिऍलिटी शो देखील होस्ट करतोय. त्यामुळे आता विकेंडच्या वारमध्ये सलमान खान दिसणार का असा प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र याबाबत अजुन कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अनलॉकमध्ये हळुहळु सर्व शूटिंग्सना सुरुवात झाली असली तरी अनेक शोच्या सेटवर काळजी घेऊनही कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने चिंता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी जरी दिसत असली तरी या संकटाचा धोका अजुन टळलेला नाही. महाराष्ट्रात १७ लाख ५७ हजार केसेस समोर आल्या आहेत. ज्यामध्ये ४६ हजार २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यु झाला आहे.   

salman khan isolates himself after his personal driver two staffers corona report positive  
 

loading image