Salman Khan: 'तर मला गुंड बनण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही..'; सिनेमा रिलीज दरम्यान सलमानच्या वक्तव्यानं खळबळ

सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमासाठी चाहते उत्सुक आहेत, पण आता दबंग खानच्या या वक्तव्यानं चाहते हैराण झाले आहेत.
Salman Khan
Salman KhanEsakal

Salman Khan: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आपला 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या भलताच व्यस्त आहे. हा सिनेमा २१ एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. भाईजान आपल्या चाहत्यांना ईदचं स्पेशल गिफ्ट या निमित्तानं देणार आहे. सलमान खानचा हा सिनेमा एक फॅमिली ड्रामा आहे. सलमान खान आपल्या कुटुंबासाठी काहीही करू शकतो हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. सिनेमातही काहीसं असंच पहायला मिळणार आहे.

सलमान खानने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तो म्हणताना दिसत आहे की,''तुम्हाला माहित आहे का मी शांतीप्रिय माणूस आहे. पण जर कोणी माझ्या कुटुंबावर हल्ला करेल तर मला गुंड बनण्यापासून कुणीच थांबवू शकणार नाही''.

व्हिडीओत सलमान खान पुढे म्हणताना दिसत आहे,''ईदी घेऊन मी तयार आहे,चला भेटा मला आणि माझ्या 'किसी का भाई किसी की जान' या कुटुंबाला''.(Salman Khan kisi ka bhai kisi ki jann on eid 2023 book online ticket)

Salman Khan
Akanksha Dubey Suicide: 'माझ्यासोबत काहीही घडलं तर जबाबदार..',आकांक्षाच्या नव्या 38 सेकंदाच्या व्हिडीओनं सत्य आलं समोर

सलमान खानच्या या व्हिडीओत सिनेमातील काही सीन्स देखील सामिल आहेत. ज्यामध्ये तो आपल्या कुटुंबासाठी शत्रूशी दोन हात करताना दिसत आहे. तर सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसकडून एक मेकिंग व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये पूजा हेगडे पासून शहनाझ गिल,पलक तिवारी या सगळ्यांसोबतच दिग्दर्शक फरहाद शामजी देखील आपला अनुभव शेअर करताना दिसत आहे.

तुम्हाला माहितीसाठी सांगतो की सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमासाठी प्रेक्षकवर्ग खूप उत्सुक आहे. याची दोन मुख्य कारणं आहेत..एक आहे ईद आणि दुसरं म्हणजे सलमान मोठ्या कालावधीनंतर पडद्यावर येतो आहे.

काही दिवसांपूर्वीच सलमान खानला शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमात अॅक्शन करताना पाहिलं गेलं होतं. या सिनेमात सलमान खाननं कॅमियो साकारला होता. सलमानच्या एन्ट्रूीला टाळ्या शिट्टयांनी थिएटर दुमदुमलं होतं.

Salman Khan
Honey Singh Breakup: हनी सिंग-टीना थडानीचं ब्रेकअप... वर्षभरातच असं काय बिनसलं?..वाचा
Salman Khan
Urvashi Rautela: ऋषभ पंत नाही.. तर 'हा' प्रसिद्ध क्रिकेटर आहे उर्वशी रौतेलाचा चाहता.. म्हणाला,'तिला पाहिलं की..'

२००९ सालापासून सलमाननं ईदला आपला सिनेमा रिलीज करण्याची प्रथा सुरू केली आहे या खास दिवसाला सलमान आपल्यासाठी लकी समजतो. आणि चाहते देखील त्याला नाराज नाही करत. आता पहायचं 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाला प्रेक्षकवर्ग किती प्रेम देतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com