esakal | पंधरा सिनेमे, सलमानच्या रोलचं नाव 'प्रेम'; वाचा काय आहे कारण!

बोलून बातमी शोधा

Salman khan named prem in 15 movies

90 च्या दशकापासून ते आत्तापर्यंतच्या सलमानच्या प्रत्येक चित्रपटातील डायलाॅग आणि गाण्याचे फॅन्स खूप आहेत.

पंधरा सिनेमे, सलमानच्या रोलचं नाव 'प्रेम'; वाचा काय आहे कारण!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई :  बॅालिवूडचा दबंग भाईजान सलमान खानचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.  90 च्या दशकापासून ते आत्तापर्यंतच्या सलमानच्या प्रत्येक चित्रपटातील डायलाॅग आणि गाण्याचे फॅन्स खूप आहेत. अशा या चुलबूल पांडेचा प्रत्येक चित्रपट ईदला प्रदर्शित होतो. सलमानचा १९८९मध्ये प्रदर्शित झालेला सुपर हिट चित्रपट 'मैने प्यार किया' मधील सलमानच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले. या सिनेमामध्ये त्याच्या भूमिकेचे नाव 'प्रेम' होते. या चित्रपटाला घवघवीत यश मिळाले. मैने प्यार किया चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक सुरज बडजात्या यांनी केले होते. 

गुढीपाडवा स्पेशल; पहा मराठमोळ्या अभिनेत्रींच्या घरातील सण

सलमाच्या चित्रपटात भूमिकेचे नाव प्रेम ठेवण्यास राजश्री प्रोडक्शनच्या सुपरहिट चित्रपट 'दुल्हन वही जो पिया मन भाये' मधून झाली होती. त्यानंतर राजश्री प्रोडक्शनच्या अंतर्गत असणाऱ्या प्रत्येक चित्रपटात त्याचे नाव प्रेम असे ठेवण्यात आले होते. ज्या चित्रपटामध्ये सलमानच्या भूमिकेचे नाव प्रेम असेल तो चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडणार असे राजश्री प्रोडक्शनला वाटू लागले. त्यानंतर त्यांनी प्रत्येक चित्रपटात सलमानच्या भूमिकेचे नाव प्रेम ठेवले. सूरज बडजात्या आणि सलमान खान या दिग्दर्शक आणि अभिनेत्याच्या जोडीने मैने प्यार किया नंतर अनेक चित्रपटांची निर्मीती केली. हम आपके हैं कोन', 'हम साथ साथ हैं', 'प्रेम रतन धन पायो' या राजश्री प्रोडक्शनच्या सुपर हिट चित्रपटांमध्ये सलमानच्या भूमिकेचे नाव प्रेम होते. 

'अंदाज अपना अपना', 'मैंने प्यार क्यों किया', 'जुड़वा', 'दीवाना मस्ताना', 'बीवी नंबर 1', 'कहीं प्यार ना हो जाए', 'नो एंट्री', 'पार्टनर', 'रेडी' यासारख्या चित्रपटात सलमानचं नाव प्रेम होतं. त्यामुळे प्रेम नावाचे आणि सलमान खानचे नाते जुने आहे असे म्हणता येईल.