बापरे! एवढ्या कोटींमध्ये विकले गेले सलमान खानच्या 'राधे' सिनेमाचे हक्क

दिपाली राणे-म्हात्रे
Wednesday, 6 January 2021

सलमान खानचा 'राधे-युअर मोस्ट वॉन्टेड भाई' हा सिनेमा खूप चर्चेत आहे. या सिनेमाशी संबंधित अशीच एक बातमी आता समोर आली आहे. 

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे सगळ्याच इंडस्ट्रींमध्ये कामावर परिणाम झाला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर बॉलीवूड इंडस्ट्रीचं काम हळूहळू रुळावर येऊ लागलं. मात्र २०२१ हे नवं वर्ष नवी उमेद देणार ठरणार आहे. या वर्षी अनेक बडे सेलिब्रिटी सिनेमे रिलीज करण्याच्या तयारीत आहेत. यातलंच एक नाव म्हणजे सुपरस्टार सलमान खान. सलमान खानचा 'राधे-युअर मोस्ट वॉन्टेड भाई' हा सिनेमा खूप चर्चेत आहे. या सिनेमाशी संबंधित अशीच एक बातमी आता समोर आली आहे. 

हे ही वाचा: हॉलीवूड स्टार किम कार्दशिअन पती कान्ये वेस्टसोबत घेणार घटस्फोट, कित्येक महिन्यांपासून राहत आहेत विभक्त  

दबंगमिया सलमान खानच्या 'राधे' या सिनेमाचे हक्क खूप महागड्या रक्कमेवर विकले गेले आहेत. विशेष म्हणजे कोरोना काळातील बॉलीवूडमधली आत्तापर्यंतची ही सगळ्यात मोठी डील मानली जात आहे. रिपोर्ट्सनुसार सलमान खानचा सिनेमा 'राधे'चे हक्क  झी स्टुडियोने २३० कोटींमध्ये खरेदी केले आहेत. यामध्ये सॅटेलाईट, डिजीटल, थिएट्रीकल आणि ओवरसीज हक्कांचा समावेश आहे.

सलमानचा हा सिनेमा २०२० पासून चर्चेत आहे. सिनेमाचं शूटींग लॉकडाऊननंतर थांबवण्यात आलं होतं. मात्र लॉकडाऊन संपताच या सिनेमाचं काम पूर्ण केलं गेलं. रिपोर्ट्समधून तर हे देखील समोर येत आहे की सलमान खानचं प्रोडक्शन हाऊस सलमान खान फिल्म्सने झी स्टुडियोजसोबत डील केली आहे त्यामुळेच सलमान खानचे जास्तीत जास्त सिनेमे झीवर रिलीज होताना पाहायला मिळतात. 

याव्यतिरिक्त सलमान खानचे याआधीचे काही सिनेमे जसं 'रेस ३', 'भारत' आणि 'दबंग ३' देखील सगळ्यात आधी झी वाहिनीवर दाखवले गेले होते. 'राधे' सिनेमाबाबत बोलायचं झालं तर हा एक ऍक्शन थ्रीलर सिनेमा आहे. हा सिनेमा २०२० मध्ये ईदला रिलीज होणार होता मात्र कोरोना व्हायरसच्या संकटामुळे याचं शूटींग पूर्ण होऊ शकलं नाही  २०२०च्या ऑक्टोबर महिन्यात या सिनेमाचं शूट संपलं. आता २०२१ मध्ये ईदच्या दिवशी हा सिनेमा रिलीज करण्याची तयारी सुरु आहे. इतकंच नाही तर 'राधे' हा सिनेमा पूर्णपणे थिएटरमध्येच रिलीज करण्याची तयारी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.   

salman khan radhe rights sold for whopping rs 230 crore to zee studios  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salman khan radhe rights sold for whopping rs 230 crore to zee studios