सल्लूचं मानधन ३१ कोटी!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 June 2019

‘बिग बॉस मराठी’ या बहुचर्चित रिॲलिटी शोची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे हिंदी ‘बिग बॉस’च्या चर्चेला उधाण आलं आहे. हिंदी ‘बिग बॉस’चं हे तेरावं सीझन असणार आहे. भाईजान सलमान खानच हे सीझन होस्ट करणार आहे. त्यासाठी त्याला एका आठवड्याला ३१ कोटी मानधन देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

या रिॲलिटी शोची सलमान निर्मिती करणार असल्याचंही बोललं जातंय. गेल्या वर्षी सलमानला ‘बिग बॉस’च्या एका आठवड्यासाठी १२ ते १४ कोटी मानधन देण्यात आलं होतं.    

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salman Khan remuneration 31 Crore