Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: पलक या चित्रपटासाठी तयार नव्हती मात्र भाईजाननं असं काही केलं की...

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचा ट्रेलर खूप चर्चेत आहे.
salman khan and palak Tiwari
salman khan and palak Tiwari Sakal

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचा ट्रेलर खूप चर्चेत आहे. काल म्हणजेच सोमवार ११ एप्रिल रोजी भाईजानच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी सलमान खान चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टसह पत्रकार परिषदेत उपस्थित होता. यादरम्यान सलमानने पलक तिवारीबद्दल एक मजेशीर खुलासा केला.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मात्र, हा चित्रपट करण्याची तिची इच्छा नसल्याचे सलमानने सांगितले. पलकसोबतच्या पहिल्या भेटीची आठवण करून देताना सलमान म्हणाला की, जेव्हा श्वेता तिवारी बिग बॉस 4 चा भाग होती. त्यादरम्यान सलमान पहिल्यांदा बिग बॉसच्या घरात पलक तिवारीला भेटला होता.

salman khan and palak Tiwari
Bholaa Box Office Collection: ‘भोला’ने पार केला 70 कोटींचा आकडा, 12व्या दिवशी केली एवढी कमाई

सलमानने सांगितले की, पलक त्यावेळी फक्त 8 वर्षांची होती. मोठी झाल्यावर पलक तिवारीने अंतिम चित्रपटाच्या सेटवर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. तिचा एक चित्रपट काही कारणास्तव प्रदर्शित होऊ शकला नाही. सुरुवातीला तिला या चित्रपटाचा भाग व्हायचे नव्हते पण नंतर तिला समजावल्यानंतर तिने या चित्रपटासाठी होकार दिला.

सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच 21 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. सलमान आणि पूजा हेगडे यांच्याशिवाय या चित्रपटात साऊथचा प्रसिद्ध अभिनेता व्यंकटेश दग्गुबती, साऊथ चित्रपटांचा प्रसिद्ध हिरो जगत्पती बाबू, बिग बॉस फेम शहनाज गिल, बॉक्सर विजेंदर सिंग, राघव जुयाल, जस्सी गिल, भूमिका चावला, सिद्धार्थ निगम आणि विनाली भटनागर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com