सलमान खान शूट करतोय 'बिग बॉस १४'चं ग्रँड प्रिमिअर, स्पर्धकांची आज घरात होणार एंट्री

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 1 October 2020

'बिग बॉस १४'चं ग्रँड प्रिमिअर शनिवारी टेलिकास्ट केलं जाणार आहे. मात्र बिग बॉसच्या चाहत्यांची खबर अशी आहे की आज १ ऑक्टोबर रोजी सलमान खान या ग्रँड प्रिमिअरचं शूट करतोय.

मुंबई- 'बिग बॉस १४'चं ग्रँड प्रिमिअर शनिवारी टेलिकास्ट केलं जाणार आहे. मात्र बिग बॉसच्या चाहत्यांची खबर अशी आहे की आज १ ऑक्टोबर रोजी सलमान खान या ग्रँड प्रिमिअरचं शूट करतोय. सलमान खानच्या बिझी शेड्युलमुळे त्याने दोन दिवस आधी शूट करण्याचा निर्णय घेतला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आज रात्री उशीरा स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात एंट्री होईल. तसंच सिद्धार्थ, हिना, गौहर दोन आठवड्यांसाठी या घरात राहणार आहेत. अशातंच जर प्रिंस नरुला या शोचा भाग बनला तर प्रेक्षकांसाठी हे खूप मोठं सरप्राईज असेल. आज ग्रँड प्रिमिअर शूट होणार असल्याने नावांचा खुलासा होईल तेव्हा सोशल मिडियावर अनेक नावं झळकतील यात शंका नाही.   

हे ही वाचा: अभिनेत्री हिना खानने केला बॉयफ्रेंड रॉकीसोबत साखरपुडा?

salman khan is shooting today the grand premiere of bigg boss 14  

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salman khan is shooting today the grand premiere of bigg boss 14