मुळशी पॅटर्नच्या रिमेकमध्ये 'भाईजानची' इंट्री

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 29 October 2020

सलमान जानेवारी २०२१ पर्यंत या चित्रपटाचे शूटींग करणार आहे. त्यानंतर सलमान त्याच्या आगामी 'टायगर' सिनेमाचं शूटींग करेल. यात त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसणार आहे.

मुंबई - बॉलीवूडचा भाईजान आता मराठीतीतील मुळशी पॅटर्न चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. अशी चर्चा आहे. या चित्रपटात सलमान खान एका पोलिसवाल्याची भूमिका साकरणार आहे. तर आयुष शर्मा गॅंगस्टरच्या भूमिकेत कास करणार आहे. आणि या सिनेमाचं शूटींग पुढील महिन्यात १५ नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

सलमान जानेवारी २०२१ पर्यंत या चित्रपटाचे शूटींग करणार आहे. त्यानंतर सलमान त्याच्या आगामी 'टायगर' सिनेमाचं शूटींग करेल. यात त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसणार आहे. सलमान खान सध्या बिग बॉस या मालिकेचा होस्ट म्हणून काम करत आहे. त्याच्या या शो चा 14 वा सीझन सुरु आहे. सलमानने  'राधे - युअर मोस्ट वॉन्टेड भाई' सिनेमाचं शूटींग पूर्ण केलं  आहे. सलमान खान २०१८ साली आलेल्या सुपरहिट 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक 'अंतिम'मध्ये दिसणार असून त्याचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहे.

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या एका रिपोर्टनुसार पनवेल फार्महाऊसमध्ये ६ महिने घालवल्यानंतर आता सलमान पुन्हा सेटवर येण्यासाठी तयार आहे. या सिनेमाची स्क्रिप्ट त्याला फार आवडली आहे. एका लहान गावातील पोलिसवाला गॅंगस्टर्सचा बिमोड करण्यासाठीचा लढा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सिनेमात पाहुण्या कलाकारांसाठी ए ग्रेट स्टार्सना लिस्ट केलं गेलं आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचं नाव 'गन्स ऑफ नॉर्थ'असं ठेवण्यात आले होते. मात्र नंतर ते बदलून 'अंतिम' करण्यात आलं.  त्याचे शूटींग मुंबई आणि कर्जतमध्ये होणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy bday Katrina . . @katrinakaif

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salman khan start shooting antim movie remake of mulshi pattern