सलमान शिवानी सुर्वेला म्हणाला कोणाच्या तरी कानाखाली दे आणि....

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

महेश मांजरेकरांनी शिवानीचा परिचय करून देताना, ‘अँग्री यंग वुमन’ असा करून दिला. म्हणूनच सलमान खानला शोमध्ये आलेलं पाहून शिवानीने महेश मांजरेकर यांना प्रश्नही विचारला की, “सर, हे स्वप्न आहे, की सत्य हेच मला समजत नाही.'

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात विकेंडच्या डावला सर्वांना एक छान सरप्राईज मिळालं. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानची चक्क विकेंडला शोमध्ये एन्ट्री झाली. लहानपणापासुन सलमान खानची चाहती असलेल्या शिवानी सुर्वेसाठी तर सलमान खानला याची देही याची डोळा पाहणं आणि त्याच्यासोबत बातचीत करायला मिळणं हा सुखद आश्चर्याचा धक्का होता.

महेश मांजरेकरांनी शिवानीचा परिचय करून देताना, ‘अँग्री यंग वुमन’ असा करून दिला. म्हणूनच सलमान खानला शोमध्ये आलेलं पाहून शिवानीने महेश मांजरेकर यांना प्रश्नही विचारला की, “सर, हे स्वप्न आहे, की सत्य हेच मला समजत नाही.'

सलमाननेही आपल्या चाहतीची थट्टा-मस्करी करायला सुरूवात केली. सलमान म्हणाला, 'हो मी सलमानचा डुप्लिकेट आहे. खरं तर, मी तुला माझ्या एका फिल्ममध्ये घेणार होतो. पण तू बिगबॉसच्या घरात आहेस. तुला जर फिल्म करायची असेल, तर एक पर्याय आहे. तिथे कुणाला तरी कानाखाली मारून निघून ये. नियमांचं उल्लंघन करून टाक'

शिवानीने यावेळी आठवणी सांगितल्या, 'पूर्वी सलमान खानच्या घराखाली जाऊन मी अनेकदा ‘जानम समझा करो’ चित्रपटातलं मधलं ‘जिद ना करो जरा समझा करो’ हे गाणं नेहमी गायचे'

यावेळी शिवानीने सलमानसमोर त्याच्याच मुझसे शादी करोगे या सिनेमातलं ‘जिने के है चार दिन’ या गाण्यावर डान्सकरून सलमानची वाहवाही घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salman Khan talks with Shivani surve at Marathi Bigg Boss