सलमान खान म्हणाला, दिशा तर बॉयफ्रेंडसोबत थायलंडमध्ये आहे, राहुल वैद्यच्या मनात झाली धाकधुक

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 16 November 2020

सलमान खानने राहुल वैद्यच्या प्रपोजलवर प्रतिक्रिया दिली आहे. या दरम्यान सलमान खानने असं काहीतरी म्हटलंय की ज्यामुळे राहुल एकदम टेन्शनमध्ये आलाय.

मुंबई- बिग बॉस १४ चा स्पर्धक राहुल वैद्यने नुकतंच दिशा परमारच्या वाढदिवशी तिला लग्नासाठी प्रपोज केलं. राहुलने नॅशनल टेलिव्हिजनवर गर्लफ्रेंडबाबतचं प्रेम व्यक्त केलं आणि सांगितलं की गेल्या २ वर्षांपासून तो अभिनेत्री दिशा परमारला डेट करत आहे. आता विकेंडच्या वारमध्ये सलमान खानने राहुल वैद्यच्या प्रपोजलवर प्रतिक्रिया दिली आहे. या दरम्यान सलमान खानने असं काहीतरी म्हटलंय की ज्यामुळे राहुल एकदम टेन्शनमध्ये आलाय.

हे ही वाचा: दिवाळीत एकाच सुटमध्ये दिसून आल्या श्वेता तिवारी आणि दिशा परमार, कोणाचा लूक जास्त आकर्षक?

राहुल वैद्यला त्याची गर्लफ्रेंड दिशा परमारच्या नावावरुन चिडवताना पहिलेतर सलमानने त्याला खूप डिवचलं आणि नंतर दिशाच्या बाबतीतली एक गोष्ट सांगून त्याला टेन्शनमध्ये आणलं. मात्र सलमान खान त्याच्यासोबत मजा-मस्करी करत होता पण राहुल वैद्य त्याची मस्करी ऐकून टेन्शनमध्ये आल्याचं पाहायला मिळालं. सलमान खानने राहुलशी दिशाबाबत उत्तर देताना प्रश्न केला. तेव्हा त्याने म्हटलं की 'अजुनही त्याच्या प्रपोजलचं कोणतंही उत्तर आलेलं नाही.'

यावर राहुल वैद्यची टिंगल करत सलमान खान म्हणाला, 'दिशाने त्याच्या प्रपोजलचं उत्तर दिलं नाही कारण ती सध्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत थायलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय.' हे ऐकून सगळे स्पर्धक हसायला लागले तर राहुल मात्र टेन्शनमध्ये आला आणि सलमानला म्हणाला, की 'असं बोलू नका. '

सलमान खानला विनंती करत राहुलने म्हटलं, तो त्याला काहीही बोलू शकतो मात्र दिशाबद्दल असं काही बोलू नका. यावर पुन्हा एकदा सलमान म्हणाला की थायलंडला काय बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसोबतंच जाऊ शकतात का? इतकंच नाही सलमान क्रिएटीव्हसोबत बोलण्याचं नाटक देखील करतो.   

salman khan teases rahul vaidya over girlfriend disha parmar says she is in vacation with boyfriend  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salman khan teases rahul vaidya over girlfriend disha parmar says she is in vacation with boyfriend