
Tiger 3 Star Salman Khan Upcoming film shooting : सलमान खानच्या टायगर ३ ने एव्हाना बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. आता सलमाननं त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
बॉलीवूडचा भाईजान म्हणून सलमानची वेगळी ओळख आहे. त्याचा चित्रपट म्हटल्यावर चाहत्यांच्या उत्साहाला उधाण येते. गेल्या काही दिवसांपासून सलमानच्या टायगरची चर्चा रंगली होती. या चित्रपटानं दोनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. एकीकडे बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला असताना दुसरीकडे सलमानच्या चित्रपटानं देखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Life Balance जाणून घ्या हा 'वेक अप काॅल' आणि बना सर्वार्थाने समृद्ध
सलमानच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णुवर्धन हे करणार आहेत. आणि त्याची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या वतीनं केली जाणार आहे. त्याच्याशी संबंधित एक मोठी अपडेट आता समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी २०२४ मध्ये त्याचा त्या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार असून द बूल असे चित्रपटाचे नाव आहे. फेब्रुवारी ते ऑगस्ट दरम्यान त्याचे शुटींग होणार असून त्यानंतर ब्रेक घेतला जाणार आहे.
असं म्हटलं जात आहे की, सलमान पहिल्यांदाच त्याच्या बॉलीवूड करिअरमध्ये निमलष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यात अभिनेत्री समंथा दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. एका रिपोर्टनुसार, समंथा या चित्रपटाची स्क्रिप्ट आणि दिग्दर्शकाशी चर्चा करण्यासाठी मुंबईत आली होती.
यापूर्वी दिग्दर्शक विष्णुवर्धनच्या शेरशाह नावाच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. विष्णूवर्धनचा हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.