Salman Khan Threat Case : सलमान खान धमकी प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे; घराची सुरक्षा वाढवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan Latest News

Salman Khan Threat Case : धमकी प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे; घराची सुरक्षा वाढवली

Salman Khan Latest News ‘प्लॅन बी’अंतर्गत बॉलिवूड दबंग सलमान खानला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या प्रकरणाचा तपास (Investigation) आता वांद्रे पोलिसांकडून मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक चंदीगडला गेले आहे. दुसरीकडे सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. इमारतीच्या आवारात मुंबई पोलिस तैनात आहेत. तर खासगी सुरक्षा रक्षक इमारतीच्या बाहेर लक्ष ठेवून आहेत.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोल्डी ब्रार हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या प्लान बीचे नेतृत्व करीत होता. कारण, लॉरेन्स विश्नोई टोळीचा शार्प शूटर कपिल पंडित याला दिल्ली पोलिस आणि पंजाब पोलिसांच्या स्पेशल सेलने संयुक्त कारवाईत भारत-नेपाळ सीमेवरून अलीकडेच अटक केली होती.

हेही वाचा: Faisal Khan : सुशांत सिंह राजपूतची हत्याच; सत्य लवकर बाहेर यावे

यापूर्वी कपिल पंडित, संतोष जाधव, सचिन विश्नोई थापन हे मुंबईतील वाळे परिसरात पनवेल येथे भाड्याने खोली घेऊन राहायला आले होते. सलमान खानचे (Salman Khan) पनवेल येथे फार्महाऊस आहे. त्यामुळेच लॉरेन्सच्या नेमबाजांनी रेकी करून ही खोली भाड्याने घेतली होती आणि जवळपास दीड महिना ते इथे राहिले होते.

बिश्नोईच्या सर्व शूटर्सकडे लहान शस्त्रे

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सर्व शूटर्सकडे लहान शस्त्रे व पिस्तूल काडतुसे होती. सलमान खानकडून ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरण घडल्यापासून सलमानची गाडी खूपच कमी वेगाने धावते हे शूटर्सनाही माहीत होते. सोबतच सलमान खान जेव्हाही पनवेलमधील फार्महाऊसवर येतो तेव्हा बहुतेक वेळा त्याचा पीएसओ शेरा त्याच्यासोबत असतो.

हेही वाचा: Money Laundering Case : जॅकलीनला करायचे होते सुकेशशी लग्न; नोराने तोडला होता संपर्क

सुरक्षा रक्षकांशी केली मैत्री

शूटर्सनी सलमान खानच्या पनवेलच्या फार्महाऊसकडे जाणाऱ्या रस्त्याची पूर्ण माहिती घेतली होती. रस्त्यावर बरेच खड्डे आहेत. त्यामुळे फार्महाऊसपर्यंत सलमानच्या गाडीचा वेग ताशी २५ किमी असायचा. लॉरेन्सच्या शूटर्सनी सलमान खानच्या फार्महाऊसच्या सुरक्षा रक्षकांशी मैत्री केली होती. जेणेकरून सलमानच्या हालचालींची सर्व माहिती मिळावी. त्यादरम्यान दोनदा सलमान फार्महाऊसवरही आला होता. परंतु, लॉरेन्सच्या नेमबाजांचा हल्ला करता आला नाही.

Web Title: Salman Khan Threat Case Investigation Mumbai Crime Branch Increased Home Security

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..