Tiger 3: रिलीजपुर्वीच सलमानच्या टायगर 3 ची रेकॉर्डब्रेक कामगिरी; टायगरचा मॅसेज पोहचला जगभरात! तब्बल ७० कोटी...

सलमान खानचा टायगर 3 दिवाळीत रिलीज होणार आहे
salman khan tiger 3 pre release record reach 700 million on instagram diwali 2023
salman khan tiger 3 pre release record reach 700 million on instagram diwali 2023SAKAL

यशराज फिल्म्सने टायगर 3 चा पहिला व्हिडीओ सोशल मिडीयावर रिलीज केलाय. टायगर का मॅसेज असं या व्हिडीओचं नाव आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.

टायगर का मॅसेजने रेकॉर्डब्रेक कामगिरी केलीय. त्यामुळे रिलीज आधीपासूनच सलमानच्या टायगर 3 ने चांगलीच हवा निर्माण केली. बघूया काय घडलंय.

(salman khan tiger 3 pre release record reach 700 million on instagram diwali 2023)

salman khan tiger 3 pre release record reach 700 million on instagram diwali 2023
काम करुन कोणाचं भलं झालंय? असं का म्हणतेय ही अभिनेत्री

टायगर 3 मधील टायगर का मेसेज या पहिल्या व्हिडिओ अॅसेटला जगभरातील प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाने सलमान खूश आहे.

यशराज फिल्म्सने गेल्या आठवड्यात टायगर का मेसेज हा खास व्हिडीओ रिलीज केला, हा त्वरित ब्लॉकबस्टर होता! हा व्हिडीओ टायगर 3 च्या ट्रेलरआधीची झलक म्हणून पाहिला जातोय.

YRF जेव्हा त्याच्या चित्रपटांच्या मार्केटिंगचा विचार करते तेव्हा टायगर का मेसेजसाठी, कंपनीने लोकांना त्यांच्या इन्स्टाग्राम पेजेस वर जास्तीत जास्त एसेट पोहोचण्यासाठी व्हिडिओ पोस्ट करण्याची परवानगी दिली. अशी गोष्ट आजवर कधीही बॉलिवूड इंडस्ट्रीत झाली नाही. ही खास गोष्ट केल्याने टायगर 3 च्या टायगर का मॅसेज व्हिडीओ तब्बल ७० कोटी लोकांपर्यंत पोहोचला. या व्हिडीओने अनेक देशांमध्ये इंटरनेट तोडले!

यशराज फिल्म्सच्या टायगर 3 मध्ये सुपर एजंट टायगर उर्फ अविनाश सिंग राठौरच्या भूमिकेत सलमान खान परत आला आहे.

सलमान खान टायगर 3 विषयी म्हणतो, “मला अॅक्शन जॉनर सिनेमे आवडतात, मला लार्जर दॅन-लाइफ अॅक्शन स्टार व्हायला आवडते. मला मोठे अ‍ॅक्शन सीन करायला आवडतात आणि टायगर 3 जितका मोठा अपेक्षित आहे तितका मोठा आहे. या चित्रपटाची कथा अशी आहे जी मला खूप आवडली आणि मला खात्री आहे की आम्ही या चित्रपटाद्वारे सर्वांना आश्चर्यचकित करू.”

टायगर 3, YRF चे घरचेच फिल्म मेकर मनीश शर्मा दिग्दर्शित, यावर्षी दिवाळीच्या सुट्टीच्या मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे! १० नोव्हेंबर २०२३ ला टायगर 3 सिनेमागृहात पाहायला मिळेल.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com