Salman Khan : 'वॉर २' अन् 'पठाण २' मधून 'टायगर'चा पत्ता कट? 'कॅमिओ'मध्ये दिसणार नाही, हे आहे कारण?

वॉर २ मध्ये सलमानच्या कॅमिओविषयी (Salman Khan) चर्चा रंगली होती. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
War 2 Salman Khan Cameo
War 2 Salman Khan Cameo esakal

Salman Khan War 2 Movie : किंग खान शाहरुख आणि टायगर सलमान खान या दोन्ही सेलिब्रेटींनी गेल्या वर्षी त्यांच्या चित्रपटातून मोठे विक्रम केल्याचे दिसून आले होते. शाहरुखच्या पठाण आणि जवाननं हजारो कोटींची कमाई केली होती. त्या तुलनेत टायगर ३ हा कमी पडला होता. मात्र शाहरुखनं सलमानला कमाईच्या बाबत धक्का दिला होता.

पठाणमध्ये बॉलीवूडचा भाईजानचा कॅमिओ होता. तर सलमानच्या टायगर ३ मध्ये शाहरुखचा कॅमिओ दिसून आला होता. या सगळ्यात येत्या काळात वॉर २ आणि पठाण २ विषयी मोठी अपडेट समोर आली आहे. वायआरएफ स्पाय युनिव्हर्सच्यावतीनं या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वॉर २ मध्ये ऋतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र या सगळ्यात वॉर २ मध्ये सलमान दिसणार नाही.

गेल्या वर्षी दिवाळी २०२३ मध्ये टायगर ३ चित्रपट आला होता. मात्र कमाईच्याबाबतीत हा चित्रपट एक था टायगर आणि टायगर जिंदा है सोबत करता येणार नाही. वायआरएफ स्पाय युनिव्हर्सच्या वतीनं आतापर्यत पाच फिल्म प्रदर्शित झाले आहेत. त्यामध्ये टायगर, पठाण आणि वॉर या चित्रपटांचा समावेश होता.

याबाबत अमर उजालानं एक वृत्त दिलं आहे. त्यामध्ये म्हटल्यानुसार, वॉर २ हा २०२५ मध्ये प्रदर्शित करण्याचा मेकर्सचा प्रयत्न असणार आहे. वॉर २ मध्ये सलमानचा कॅमिओ असणार अशी चर्चा होती. मात्र आता तो त्यात दिसणार नाही. अशी चर्चा सुरु झाली आहे. बॉलीवूड हंगामाच्या एका रिपोर्टमध्ये त्याबाबत असा दावा करण्यात आला आहे.

War 2 Salman Khan Cameo
Christopher Nolan wins Oscar 2024 : आयुष्यातलं पहिलं ऑस्कर, ओपनहायमरचा दिग्दर्शक नोलन झाला भावूक! डोळे पाणावले...

प्रत्येकवेळी कॅमिओमुळे टायगरच्या इमेजला मोठा धक्का बसू शकतो. यामुळे निर्मात्यांनी यापुढील काळात सलमानच्या कॅमिओबाबत वेगळा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे असेही म्हटले जात आहे की, सलमान हा कॅमिओ करुन थकला आहे. त्याला आता एक मोठी भूमिका साकारायची आहे. अशीही चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com