Salman Khan Director: सलमान खानच्या कास्टिंग डायरेक्टरला दिल्लीत मारहाण, ६ तरुणांनी धोपटला

ही घटना दिल्लीतील असून या मारामारीत तो जबर जखमी झाला
Salman Khan's casting director mayank dixit beaten up in Delhi, fir against 6 youths
Salman Khan's casting director mayank dixit beaten up in Delhi, fir against 6 youthsSAKAL

Salman Khan Casting Director Mayank Dixit News: यावेळी सलमान खानशी संबंधित एक बातमी चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे.

सलमान खानच्या एका चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक आणि कास्टिंग डायरेक्टर असलेल्या मयंक दीक्षितला मारहाण करण्यात आली.

ही घटना दिल्लीतील असून या मारामारीत तो जबर जखमी झाला. ही घटना रविवारची असून याप्रकरणी काही अज्ञातांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

(Salman Khan's casting director mayank dixit beaten up in Delhi, fir against 6 youths)

मयंक दीक्षित यांना रविवारी रात्री (2 जुलैच्या रात्री) लक्ष्मी नगर परिसरात काही लोकांच्या टोळक्याने मारहाण केल्याने त्यांच्या मानेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.

आरोपींची ओळख अद्याप पटलेली नसून त्यांचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. दरम्यान या अनोळखी व्यक्तींविरोधात FIR दाखल करण्यात आलाय

Salman Khan's casting director mayank dixit beaten up in Delhi, fir against 6 youths
Digpal Lanjekar Subhedar: खरा शिवभक्त! दिग्पाल लांजेकरांनी तान्हाजींच्या साताऱ्यात केलंय 'हे' महत्वाचं काम

रविवारी दिल्लीतील लक्ष्मीनगर परिसरात 6 जणांच्या टोळक्याने सलमान खानच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला बेदम मारहाण केली. यात कोणताही वैयक्तिक वाद नसुन रस्त्यावरील रागाचे आहे.

घटना अशी आहे की, कार रिव्हर्स करताना कास्टिंग डायरेक्टरचा मयंकचा आरोपींसोबत वाद झाला आणि ते पाहताच त्यांच्यात हाणामारी झाली. या प्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे, मात्र अद्याप या लोकांची ओळख पटलेली नाही.

Salman Khan's casting director mayank dixit beaten up in Delhi, fir against 6 youths
Sameer Wankhede Case Update: लाच देणाराही आरोपीच! समीर वानखेडेंना दिलासा, आर्यन खान केस प्रकरणात मोठा निर्णय

वृत्तानुसार, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींना पकडण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करत आहेत. मात्र, या प्रकरणी कास्टिंग डायरेक्टरने कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

2008 साली आलेल्या 'युवराज' चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त झायेद खान, अनिल कपूर आणि कतरिना कैफ देखील होते. या सिनेमासाठी मयंकने काम केलेलं होतं.

याशिवाय मयंकने 'तोरबाज'चे कास्टिंग डायरेक्टर म्हणुन काम केलंय. ज्यामध्ये संजय दत्त आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com