Sameer Wankhede Case Update: लाच देणाराही आरोपीच! समीर वानखेडेंना दिलासा, आर्यन खान केस प्रकरणात मोठा निर्णय

उच्च न्यायालयाने समीर वानखेडेला सीबीआयच्या अटकेतून अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
sameer wankhede Relief for arrest bombay high court hc allows to ammend petition to prosecute bribe giver
sameer wankhede Relief for arrest bombay high court hc allows to ammend petition to prosecute bribe giver SAKAL
Updated on

Sameer Wankhede Case Update News: अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (NCB) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. समीर वानखेडे यांच्यावर २५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ शिप ड्रग बस्ट प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी समीरने 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणात उच्च न्यायालयाने समीर वानखेडेला सीबीआयच्या अटकेतून अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

(sameer wankhede Relief for arrest bombay high court hc allows to ammend petition to prosecute bribe giver)

sameer wankhede Relief for arrest bombay high court hc allows to ammend petition to prosecute bribe giver
Neerja Set Leopard News: मायरा वैकुळच्या हिंदी मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसला, सेटवर घबराट

न्यायालयाने समीर वानखेडे यांना याचिकेत सुधारणा करण्यास परवानगी दिली आणि त्यांना सक्तीच्या कारवाईपासून संरक्षण दिलंय. आता समीर वानखेडे यांना अटकपासुन 20 जुलैपर्यंत दिलासा मिळालाय..

आता 20 जुलैपर्यंत तपास यंत्रणा त्यांना अटक करू शकणार नाही. 2021 मधील कॉर्डेलिया क्रूझ शिप ड्रग्स प्रकरणाशी संबंधित आहे. या जहाजावर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही उपस्थित होता.

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवून अटक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात नंतर सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. याशिवाय २५ कोटींची लाच मागीतल्याचा आरोप केलाय.

sameer wankhede Relief for arrest bombay high court hc allows to ammend petition to prosecute bribe giver
Kriti Sanon Production House: क्रितीच्या नवीन प्रॉडक्शन हाऊसचा संबंध थेट सुशांत सिंग राजपुतशी? जाणुन घ्या

काय आहे निर्णय:

या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन वर कारवाई न करण्याच्या बदल्यात लाच घेतल्याचा आहे समीर वानखेडेंवर आरोप होता. लाचखोरी प्रकरणात लाच घेणारा तसेच देणारा दोघेही दोषी आहेत, असा दावा वानखेडेंच्या वकिलांनी केलाय.

वकिलांचा दावामात्र सीबीआयने फक्त कथित लाच घेणाऱ्यांवर केला आहे गुन्हा दाखल तर लाच देणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नाहीत्यांच्यावर देखील कारवाई करण्याची आहे वानखेडे यांची मागणी वानखेडे यांच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी वानखेडे गेले आहेत उच्च न्यायालयात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Yeola government clerk bribery news
Three Cops Booked After Accepting ₹7,000 Bribe to Process Accident FIR
Gondia tehsil office bribery case
Who was caught in the Chandrapur bribery case?
Marathi News Esakal
www.esakal.com