
सलमानच्या 'वॉन्टेड' या चित्रपटाचा सिक्वेल असलेला 'राधे' यावर्षी रिलिज होणार आहे. राधेचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये नव्या वर्षासह अनेक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मनोरंजनाची मेजवानी या निमित्ताने प्रेक्षकांना मिळतेय. 'दबंग 3' च्या प्रदर्शनानंतर आता सलमान खानचा नवा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येत आहे. सलमानच्या 'वॉन्टेड' या चित्रपटाचा सिक्वेल असलेला 'राधे' यावर्षी रिलिज होणार आहे. राधेचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
सलमान खान दरवर्षी काही मोजकेच सिनेमे घेऊन येतो. पण, ते बॉक्सऑफिसवर हिट होतील याची तो काळजी घेतोच. ईदेच्या मुहुर्तावर हा सलमानचा अॅक्शनपट 'राधे' रिलिज होणार आहे.
Radhe onset locations...its just 4months for #Radhe now..give us some onset stills guys.. @SohailKhan @atulreellife @SKFilmsOfficial pic.twitter.com/HlXtp1nolq
— BeingHonest (@Itsss_Shivam) January 20, 2020
बंदुकीची फायरिंग करताना सलमान या पोस्टरमध्ये दिसतो आहे. तरण आर्दशने त्याचा पोस्टर शेअर केला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन डान्स मास्टर प्रभू देवा करत आहे. तर, निर्मितीकरण सलमानचा भाऊ सोहेल हा करत आहे. सिनेमाचं शुटिंग सध्या सुरु आहे आणि त्यामुळे त्याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
राधे हा सिनेमा सलमानच्या 'वॉन्टेड' सिनेमाचा सिक्वेल आहे. वॉन्टेड 2009 मध्ये रिलिज झाला होता. त्यामध्ये सलमान राधे नावाची व्यक्तीरेखा साकारत होता. त्यावरुनच सिक्वेलच्या भागाचे नाव 'राधे' देण्यात आले आहे.