Aishwarya-अभिषेकचं लग्न, सलमानच्या प्रतिक्रियेनं सर्वांची बोलती झालेली बंद Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan's 'SHOCKING' reaction to Aishwarya Rai, Abhishek Bachchan's marriage will surprise you

Aishwarya-अभिषेकचं लग्न, सलमानच्या प्रतिक्रियेनं सर्वांची बोलती झालेली बंद

बॉलीवूडचं पावरफुल कपल विषयी बोलायचं झालं तर ऐश्वर्या राय-बच्चन(Aishwarya Rai-Bachchan) आणि अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan) यांचे नाव नक्कीच घ्यावे लागेल. दोघांचे लग्न २० एप्रिल,२००७ रोजी झाले होते. याआधी ऐश्वर्या राय बॉलीवूडचा दबंग खान सलमान खानची 'लेडी लव' होती. तर अभिषेक आणि करिष्मा कपूर यांचे लग्न होणार होते. परंतु,२००३ मध्ये काही कौटुंबिक मतभेदांमुळे करिष्मा-अभिषेकचा साखरपुडा तुटला. सगळ्यांना माहित आहे की बॉलीवूडची अधूरी प्रेम कहाणी कोणती तर ती सलमान-ऐश्वर्याची. (Salman Khan's 'SHOCKING' reaction to Aishwarya Rai, Abhishek Bachchan's marriage will surprise you)

हेही वाचा: Jacqueline ला सुकेश चंद्रशेखर तिहार जेलमधून करायचा फोन, मोठा खुलासा

एक वेळ होती जेव्हा सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. पण एक दिवस असा आला की ज्या दिवशी या दोघांमधला वाद रस्त्यावर आला. ऐश्वर्यानं दबंग खानवर गंभीर आरोप लावले. चला आज थोडं सलमानच्या त्या खास उत्तराविषयी जाणून घेऊया जेव्हा अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नानंतर भाईजानने त्याचं मन किती मोठं आहे हे दाखवून दिलं होतं.

हेही वाचा: 'Ajay Devgan आणि माझ्यात वाद तिसऱ्या व्यक्तीमुळे',Kiccha Sudeep चा खुलासा

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एक मोठा रोमॅंटिक सिनेमा घेऊन येत होते. या सिनेमासाठी त्यांनी सलमान,ऐश्वर्याला मु्ख्य भूमिकेसाठी निवडलं तर अजय देवगणही त्या सिनेमाचा महत्वाचा भाग होता. या सिनेमाचं नाव होते 'हम दिल दे चुके सनम'. सिनेमाचं शूटिंग सुरू झालं.आणि बघता बघता ऐश आणि सलमान प्रेमात पडले. दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. दोघांच्या 'हम दिल दे चुके सनम' सिनेमानं पडद्यावर कमाल केली,दोघांची जोडी रिल लाइफमध्ये सुपरहिट ठरली. पण त्यानंतर मात्र हळूहळू त्याच्या पर्सनल लाइफमध्ये कडवटपणा येऊ लागला.

हेही वाचा: R Madhavan's Rocketry: सिनेमा पाहून खेर रडले, भारतीयांनी माफी मागा म्हणाले

आता सलमान ऐश्वर्याच्या नात्याविषयी लोक अनेक तोंडी, बऱ्याच गोष्टी बोलले. पण सगळ्यात मोठा दावा केला गेला की सलमान-ऐश्वर्या ३ वर्षासाठी रिलेशनशीपमध्ये होते आणि २००२ मध्ये ते वेगळे झाले. दोघांच्या आयुष्यात तेव्हा वादळ आलं जेव्हा ऐश्वर्यानं सलमानवर आरोप केला,तिला मारण्याचा. हा तोच काळ होता जेव्हा सलमानच्या इमेजवर घमेंडी आणि आगाऊ असा शिक्का पडला होता. आता सलमानने नेहमीच या आरोपांचे खंडन केलं आणि यात काहीच दम नसल्याचं सांगितलं.

एकदा सलमानने त्याच्या स्वभावाविषयी पसरलेल्या अफवांवर आणि ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर चुप्पी तोडत मोकळेपणाने संवाद साधला होता. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सलमान म्हणाला होता, ''मला मनापासून वाटतं की तिनं तिच्या आयुष्यात खूप खुश रहावं. आणि दबंग खानची हिच गोष्ट त्याच्या चाहत्यांच्या मनाला भावली होती''.

हेही वाचा: Mee Too: 'मी आत्महत्या करणार नाही पण...' तनुश्री दत्ताची मदतीसाठी हाक

आता ऐश्वर्या आणि सलमान दोघंही आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत. सलमानने आजही लग्न केलं नाही तर ऐश्वर्या बॉलीवूडच्या मोठ्या कुटुंबाची म्हणजे बच्चन कुटुंबाची सूनबाई झाली आहे. तिला एक दहा वर्षांची मुलगी आहे,जिचं नाव आराध्या आहे.

Web Title: Salman Khans Shocking Reaction To Aishwarya Rai Abhishek Bachchans Marriage Will Surprise

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..