'तेरे नाम' पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 April 2019

'तेरे नाम' हा सिनेमा 2003 मध्ये आला होता. या सिनेमात सलमान खानसोबत भूमिका चावला मुख्य भूमिकेत होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा एकदा 'तेरे नाम'चा सिक्वेल प्रेक्षकांवर भुरळ घालण्यासाठी येणार आहे.

राधे भैय्याच्या हेअर स्टाईलने तर कॉलेज तरुणांवर चांगलीच भुरळ घातली होती. शहरांपासून - गावा खेड्यापर्यंत जिकडे-तिकडे 'राधे भैय्या' पाहायला मिळत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले असून सीक्वलचे ही दिग्दर्शन तेच करणार आहेत, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. 

‘तेरे नाम’ या चित्रपटाला विविध पुरस्कारांमध्ये तब्बल 24 नामांकने मिळाली होती. त्यातील ‘तेरे नाम’ या चित्रपटाने सात पुरस्कार पटकावले होते. हा चित्रपट 16 वर्षानंतर पुन्हा चाहत्यांच्या भेटीस लवकरच येणार आहे. एका वृत्तपत्राच्या दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांनी ‘तेरे नाम 2’ची स्क्रिप्ट पूर्ण केली आहे. 

काही दिवसांपूर्वी सतीश कौशिक यांनी या सीक्वलसाठी सलमान खानशी संपर्क साधला होता. मात्र सलमानने या चित्रपटाला नकार दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. सलमानच्या नकारानंतर सतीश कौशिक दोन नव्या कलाकारांना घेवून हा चित्रपट करणार असल्याचे सांगण्यात येते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salman Khans Tere Naam sequel directed by Satish Kaushik