
वय नावाला, सलमानची कमी वयाच्या अभिनेत्रींसोबतची 'केमिस्ट्री'
'वय हा केवळ आकडा आहे', हेच आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानला Salman Khan पाहून म्हणावं लागेल. खरंतर वाढत्या वयानुसार कलाकाराला मिळालेल्या भूमिका बदलत जातात. याला अपवाद म्हणून काही कमी वयाचे कलाकार हे आईवडिलांच्या भूमिकेतही पाहायला मिळतात. पण वय कितीही वाढलं तरी हिरोची मध्यवर्ती भूमिका मिळायला आणि त्यासोबत आपल्याहून कमी वयाच्या अभिनेत्रींच्या प्रियकराची भूमिका मिळायला 'दबंग खान'सारखंच नशिब लागतं. चित्रपटांतील भूमिकांच्या नजरेतून पाहिलं तर १९९० पासून सलमानचं पडद्यावरील वय वाढलंच नाही. इतकंच काय, तर खुद्द सलमानलाही हेच वाटतं. 'राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई' Radhe या चित्रपटात त्याच्यासोबत २८ वर्षीय अभिनेत्री दिशा पटानी Disha Patani मुख्य भूमिका साकारतेय. या दोघांच्या वयातील अंतराबद्दल विचारलं असता, "मीच दिशाच्या वयाइतका दिसतोय" असं तो म्हणाला. सलमानचं वय ५५ वर्षे इतकं आहे. (Salman Khans widening age gap with his leading ladies disha patani sai manjrekar sonakshi sinha)
सलमानचे चित्रपट पाहणाऱ्यांना याबद्दल फारसा काही फरक पडत नसावा. कारण सलमानने याआधीही अनेकदा त्याच्याहून २० वर्षांपेक्षा कमी असलेल्या अभिनेत्रींसोबत काम केलंय. याउलट त्याच्याहून वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींनी त्याच्या आईचीही भूमिका साकारली आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सोनाली ही सलमानपेक्षा वयाने ९ वर्षांनी लहान आहे आणि ती २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भारत' या चित्रपटात त्याच्या आईच्या भूमिकेत दिसली होती.
हेही वाचा : अभिनेत्रीचं पोस्टर पाहून हरभजन 'क्लीन बोल्ड'; वाचा भन्नाट किस्सा
सलमान आणि त्याच्या सहअभिनेत्रींच्या वयातील फरक-
सलमानचा सर्वांत हिट फ्रँचाइस 'दबंग' या चित्रपटात काम करताना तो ४५ वर्षांचा होता. या चित्रपटात त्याने २३ वर्षीय सोनाक्षी सिन्हासोबत रोमान्स केलं होतं. याच चित्रपटाचा तिसरा भाग 'दबंग ३' हा २०१९ मध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये २१ वर्षीय अभिनेत्री सई मांजरेकरने त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. सई आणि सलमानमध्ये तब्बल ३३ वर्षांचं अंतर आहे. कतरिना कैफ, सोनम कपूर आणि अनुष्का शर्मा यांचं आणि सलमानच्या वयातील अंतरही फार आहे. सलमान आणि त्याच्या सहअभिनेत्रीच्या वयातील अंतर पहिल्यांदा २० वर्षांहून अधिक होतं, ते म्हणजे 'लकी' या चित्रपटात. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेत्री स्नेहा उल्लालने सलमानच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. त्यावेळी ती १७ आणि सलमान ४० वर्षांचा होता.
सलमान आता ५५ वर्षांचा आहे. पण वयाच्या या आकड्याचा त्याच्या भूमिकांवर किंवा चित्रपटांवर काही फरक पडत नाही. दरवर्षी 'ईद'च्या मुहूर्तावर सलमानचा चित्रपट प्रदर्शित होतो आणि काही अपवाद वगळता त्याला बॉक्स ऑफिसवरही धमाकेदार प्रतिसाद मिळतो.
Web Title: Salman Khans Widening Age Gap With His Leading Ladies Disha Patani Sai Manjrekar Sonakshi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..