esakal | 'सेलमॉन भॉई' मोबाइल गेमविरोधात सलमान खान कोर्टात
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan

'सेलमॉन भॉई' मोबाइल गेमविरोधात सलमान खान कोर्टात

sakal_logo
By
सुनिता महामुणकर - सकाळ वृत्तसेवा

अभिनेता सलमान खानच्या Salman Khan २००२ मधील हिट अँड रन Hit and Run case खटल्यावर आधारित असलेला सेलमॉन भॉई Selmon Bhoi या ऑनलाईन मोबाईल गेमवर तात्पुरती बंदी आणण्याचा आदेश शहर दिवाणी न्यायालयाने दिला आहे. तसेच गुगल प्ले स्टोअरवरुनही या गेमसंबंधित सर्व साहित्य तातडीने काढून टाकण्याचे आदेश न्यायालयाने गेम तयार करणाऱ्या कंपनीला आणि गुगल एलएलसीला दिले आहेत. सलमानने मागील महिन्यात न्यायालयात केलेल्या दाव्यावर सोमवारी अतिरिक्त सत्र न्या. के एम जयस्वाल यांच्यापुढे सुनावणी झाली. सलमानच्या संबंधित अथवा साधर्म्य असलेला कोणताही मजकूर गेमचे निर्माते पॅरडी स्टुडिओ प्रा. लि. आणि त्याच्या दिग्दर्शकांनी प्रदर्शित किंवा पुनर्प्रदर्शित करु नये असे प्रतिबंधक आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

या ऑनलाईन गेमची तपासणी केली असता सलमानने केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आणि समानता आढळत आहे. हिट अँड रन प्रकरण आणि गेम यामध्ये साधरण आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. जर सलमानने या गेमला इन्स्टॉल आणि तयार करण्यासाठी आणि त्याच्या नावाच्या वापरासाठी परवानगी दिलेली नाही आणि हे प्रकरण त्याच्याविरोधात होते. तर मग त्याच्या खासगी आयुष्य जगण्याच्या, गोपनीयतेच्या अधिकारांचा भंग होत आहे, आणि त्याची प्रतिमा मलिन होत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. केवळ व्यावसायिक लाभ मिळवण्यासाठी सलमानच्या नावाचा वापर विकासकांनी केला आहे, असे न्यायालयाने सुनावले आहे.

हेही वाचा: अक्षय कुमारला मातृशोक, अरुणा भाटिया यांचं निधन

सलमानचे सलमान भाई या नावाची ओळख, त्याच्याप्रमाणे कॅरीकेचर काढून आणि हिट अँड रनचा संदर्भ घेऊन हा सेलमॉन भाई हा गेम तयार केला आहे, अशी तक्रार सलमानने केली आहे. केवळ आर्थिक फायदा मिळवण्यासाठी सलमानची परवानगी न घेता हा गेम बनविण्यात आला आहे, असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला. सलमानने उपस्थित केलेल्या मुद्यांवर लेखी खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यावर पुढील सुनावणी 20 सप्टेंबर रोजी होणार आहे.

2002 मध्ये वांद्रे येथे हिट अँड रन प्रकरण घडले होते. या खटल्यातून उच्च न्यायालयाने सन 2015 मध्ये त्याला निर्दोष मुक्त केले आहे.

loading image
go to top