ब्रेसलेट इतकं खास का? ७ वेळा बदललाय खडा; पाहा सलमान काय म्हणाला |Entertainment News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan

ब्रेसलेट इतकं खास का? ७ वेळा बदललाय खडा; पाहा सलमान काय म्हणाला

बॉलीवूड अभिनोता सलमान खान (Salman Khan) वाढदिवसाआधीच एका लहानशा अपघाताला सामोरं गेला. सलमानला साप चावला होता. सुदैवाने हा साप विषारी नव्हता, त्यामुळे सलमानला कोणतीही हानी झाली नाही. याआधीही त्याच्यावर काही संकटं आली होती ती टळली. आता हा चमत्कार आहे की कुणाची प्रार्थना, हे माहीत नाही, पण या सगळ्या प्रसंगी सलमानच्या हातात नेहमीच ब्रेसलेट दिसलं आहे. या ब्रेसलेटशिवाय सलमान क्वचितच दिसतो. अगदी चित्रपटातसुद्धा त्याच्या हातात हे ब्रेसलेट दिसतंच.

एकदा त्याच्या एका चाहत्यांशी संवाद साधताना ब्रेसलेटबद्दल खास माहिती सांगितली होती. सलमान म्हणाला होता की 'माझे वडील ते ब्रेसलेट घालायचे, त्यावेळी मी या ब्रेसलेटने खेळायचो. आणि मग मी काम करायला लागलो तेव्हा त्यांनी मला नेमके तेच ब्रेसलेट भेट दिले. या स्टोनला फिरोजा म्हणतात.'

पुढे, सलमानने त्याच्या ब्रेसलेटमधील स्टोनबद्दल सांगितले. तो म्हणतो- 'स्टोन दोनच प्रकारचे असतात. जेव्हा कोणतीही नकारात्मकता तुमच्याकडे येते तेव्हा हा स्टोन सर्वात आधी ते आपल्याकडे खेचून घेतो. तो स्टोन नकारात्मकतेला स्वतःकडे घेऊन जातो, त्यात शिरा तयार होतात आणि त्याला तडे जातात. हा माझा सातवा स्टोन हे.'

सलमानसाठी हे ब्रेसलेट खूप महत्त्वाचे आहे. काही वर्षांपूर्वी सलमान त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर त्याच्या मित्रांसोबत पार्टी करत असताना त्याचे ब्रेसलेट हरवले होते. त्यावेळी सलमानचा चेहरा उतरला होता, तो निराश झाला होता. तरी तो शांत राहिला आणि मित्रांसह ब्रेसलेट शोधू लागला. त्यानंतर अश्मित पटेलने (Ashmit Patel) स्विमिंग पूलमध्ये पडलेले ब्रेसलेट सलमानला दिले. ब्रेसलेट मिळताच सलमानचा चेहरा उजळला.

Salman Khan

Salman Khan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top