Sam Bahadur: 'सॅम बहादूर'मधील युद्ध प्रसंगांसाठी खऱ्या तोफ - रणगाड्यांची खरेदी, मेघना गुलजार यांचा खुलासा

सॅम बहादूरचा युद्धप्रसंग जीवंत होण्यासाठी खास प्रयत्न करण्यात आले आहेत
Sam Bahadur war scenes in 'Sam Bahadur' Purchase of tanks, Meghna Gulzar reveals
Sam Bahadur war scenes in 'Sam Bahadur' Purchase of tanks, Meghna Gulzar revealsSAKAL
Updated on

Sam Bahadur News: विकी कौशलच्या सॅम बहादूर सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सॅम बहादूर सिनेमा फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यावर आधारीत आहे.

सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. अशातच सिनेमाविषयी नवनवीन रंजक गोष्टी समोर येत आहेत. सॅम बहादूरमधील युद्धप्रसंग जीवंत वाटावेत म्हणून खऱ्या रणगाडे आणि तोफांची खरेदी कर समावेश करण्यात आलाय.

Sam Bahadur war scenes in 'Sam Bahadur' Purchase of tanks, Meghna Gulzar reveals
“We are engaged…” पूजा सावंतने दिली प्रेमाची कबुली? रिलेशनशीपचा केला खुलासा... कोण आहे स्पेशल व्यक्ती?

विकी कौशलचा आगामी चित्रपट ‘सॅम बहादूर’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट देशातील पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ आणि भारतीय लष्कराच्या असीम शौर्याला समर्पित आहे. या चित्रपटात विकी मुख्य भूमिका निभावणार आहे.

वास्तविक, या चित्रपटात युद्धासंदर्भात चार प्रमुख प्रसंग दाखविण्यात आले आहेत. ते अचूक पद्धतीने चित्रित करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला आहे.

निर्मात्यांनी प्रत्येक युद्धाचे प्रसंग त्या काळानुरूप वेगळे आणि अचूक बनवण्याकरता किती प्रयत्न केले याची माहिती समोर येत आहे की, या चित्रपटातील महत्त्वाच्या युद्ध प्रसंगांच्या चित्रिकरणासाठी तोफा, क्षेपणास्त्र डागणारी वाहने, रणगाडे इत्यादींसह हजारो शस्त्रे आणि युद्ध वाहनांची खरेदी करण्यात आली होती.

हा चित्रपट असीम शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांनी भारतीय सैन्याचे तडफदार नेतृत्व केले आणि बांगलादेशची निर्मिती करण्यात मोलाची कामगिरी बजावली.

चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले असून त्यांनी भवानी अय्यर आणि शंतनू श्रीवास्तव यांच्या समवेत या चित्रपटाचे लेखन देखील केले आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी ‘आरएसव्हीपी मूव्हीज’च्या बॅनरखाली करण्यात आली आहे.

या चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक आणि झीशान अय्युब यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहांत झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com