esakal | समंथाने डिलिट केलं नागार्जुन यांच्यासाठीचं ट्विट; नंतर स्वत:च..
sakal

बोलून बातमी शोधा

समंथाने डिलिट केलं नागार्जुन यांच्यासाठीचं ट्विट; नंतर स्वत:च..

समंथाने डिलिट केलं नागार्जुन यांच्यासाठीचं ट्विट; नंतर स्वत:च..

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री समंथा अक्किनेनी Samantha Akkineni आणि तिचा पती नाग चैतन्य Naga Chaitanya यांच्या नात्यातील दुराव्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. या चर्चांदरम्यान समंथाने सोमवारी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये आधी तिने सासरे नागार्जुन Nagarjuna यांचा उल्लेख 'मामा' असा केला नव्हता. ही चूक लक्षात येताच तिने ट्विट डिलिट करून नव्या ट्विटमध्ये त्यांच्या नावासमोर 'मामा' असा उल्लेख केला. तेलुगूमध्ये सासऱ्यांना 'मामा' असं संबोधलं जातं.

नागार्जुन यांनी त्यांच्या दिवंगत वडिलांचा एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला होता. त्याच व्हिडिओवर समंथाने कमेंट केली आहे. 'हे खूप सुंदर आहे, नागार्जुन मामा' असं तिने लिहिलं आहे. मात्र 'पिंकविला'ने दिलेल्या वृत्तानुसार, समंथाने आधीच्या ट्विटमध्ये त्यांना 'मामा' असं म्हटलं नव्हतं. हे ट्विट डिलिट करून तिने नवीन ट्विटमध्ये त्यांच्या नावासमोर 'मामा' असं म्हटलं.

हेही वाचा: "तुम्हाला थोडीसुद्धा अक्कल नाही का?", घटस्फोटाविषयी विचारताच समंथा भडकली

हेही वाचा: राजला जामीन मंजूर होताच शिल्पाची खास पोस्ट

समंथा आणि नाग चैतन्य यांच्या नात्यातील दुराव्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. हे दोघं घटस्फोट घेणार असल्याचंही म्हटलं जात आहे. समंथाने तिच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवरून अक्किनेनी हे आडनाव काढल्यानंतर या चर्चांना सुरुवात झाली.

मुलगा आणि सुनेच्या नात्यामधील मतभेदांबद्दल काय म्हणाले नागार्जुन?

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार घटस्फोटाच्या चर्चांवर नागार्जुन म्हणाले, "नाग चैतन्यने कधीही त्याच्या पत्नीची फसवणूक केली नाही. याउलट, २०१७ साली लग्न केल्यापासून तो नेहमीच एक प्रेमळ पती म्हणून वागला आहे. वैवाहिक आयुष्यातील कोणत्याही नियमाचं, वचनाचं उल्लंघन त्याने केलं नाही. मजिली या चित्रपटात त्याला ऑनस्क्रीन पत्नीसोबत (समंथा) रागाने वागावं लागलं होतं. असं असतं तरी आपल्या पत्नीसाठी कॅमेरात द्वेषाने पाहणं त्याच्यासाठी खूप कठीण होतं. आता जेव्हा त्याला समंथासोबत मतभेद दूर करण्यास सांगितलं जातंय, तेव्हा त्याला नक्की कुठून सुरुवात करावी हे कळत नाहीये.'

loading image
go to top