esakal | राजला जामीन मंजूर होताच शिल्पाची खास पोस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Shilpa Raj 3

राजला जामीन मंजूर होताच शिल्पाची खास पोस्ट

sakal_logo
By
स्वाती वेमूल

पॉर्नोग्राफी प्रकरणात आरोपी असलेल्या राज कुंद्राला Raj Kundra अखेर सोमवारी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. राजला जामीन मिळाल्याच्या काही तासांनंतर शिल्पाने Shilpa Shetty सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. 'वाईट वादळानंतर सुंदर गोष्टी घडू शकतात हे सिद्ध करण्यासाठी इंद्रधनुष्य अस्तित्वात आहेत,' ही रॉजर ली यांची ओळ तिने पोस्टमध्ये शेअर केली आहे. यासोबतच शिल्पाने इंद्रधनुष्यचा फोटो पोस्ट केला आहे.

राजला जामीन मंजूर

मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला जुलैमध्ये अटक केली होती. पोलिसांनी नुकतीच या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यानंतर कुंद्राने नव्याने दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्याला पन्नास हजार रुपये जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा चुकिच्या आधारांवर असून केवळ शॉर्ट फिल्म्स तयार केल्या किंवा अपलोड केल्याचा पुरावा पोलिसांकडे नाही आणि आरोपपत्रात त्याचा उल्लेख नाही, असा दावा केला आहे. जामिनाची कारवाई पूर्ण करुन कुंद्रा मंगळवारी कारागृहातून बाहेर येणार आहे. हॉटशॉट आणि बॉलीफेम अॅपमार्फत अश्लील कंटेंट प्रसारित केल्याचा आरोप पोलिसांनी कुंद्रावर ठेवला आहे. न्यायालयाने कुंद्राचा सहकारी रायन थॉर्पलाही जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा: ..तेव्हा कपूर कुटुंबानेही आईकडे पाठ फिरवली होती- करीना कपूर

हेही वाचा: अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा केला प्रयत्न

राजला आणखी एका प्रकरणात दिलासा

मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या अन्य एका प्रकरणात देखील सोमवारी कुंद्राला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. या प्रकरणात त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने कुंद्रासह अभिनेत्री पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांच्यावर 6 ऑक्टोबरपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. कुंद्रासह शर्लिननेदेखील अश्लील व्हिडीओ बनविला असा गुन्हा पोलिसांनी नोंदविला आहे.

loading image
go to top