सलमानसोबतच्या 'त्या' नात्यावर अखेर सामंथानं शिक्कामोर्तब केलं...Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan, Samantha Lockwood

सलमानसोबतच्या 'त्या' नात्यावर अखेर सामंथानं शिक्कामोर्तब केलं...

सलमान खाननं आजवर लग्न जरी केलं नसलं तरी त्याच्या आयुष्यात अनेक सुंदर सुंदर अभिनेत्री दस्तक देऊन गेल्यात. केवळ सलमाननं नातं पुढे नेलं नाही म्हणून अन्यथा त्याच्याशी लग्नास कोण तयार झालं नसेल. असो,हा सगळा इतिहास आहे म्हणा पण आता काही दिवसांपासून त्याचं नाव सामंथा लॉकवूड या हॉलीवूडच्या अभिनेत्रीशी जोडलं जातंय. सामंथा सध्या एका प्रोजेक्टच्या निमित्तानं मुंबईत आहे. ती काही दिवसांपूर्वी ऋतिक रोशनलाही भेटली होती. तेव्हा ती लवकरच बॉलीवूडच्या सिनेमात दिसेल या चर्चेला उधाण आलं होतं. तेव्हा सामंथानं आपल्याला बॉलीवूड सिनेमे आवडतात,चांगली संधी मिळाली तर निश्चितच विचार करीन बॉलीवूड सिनेमात काम करण्याचा असं स्पष्ट सांगितलं होतं.

हेही वाचा: 'मन झालं बाजिंद' मालिकेतील अभिनेत्रीला लागला शॉक?

काही दिवसांपासून सामंथा लॉकवूड अन् सलमान खानच्या लिंकअपच्या बातम्या चर्चेत आहेत. सलमानच्या ५६ व्या वाढदिवसाला सामंथा उपस्थित होती म्हणून या लिंकअपच्या बातमीनं जोर धरलेला. यावर नुकतंच एका इंग्रजी वेबसाईटला सामंथानं स्पष्टिकरण दिलंय. ती म्हणाली, ''सलमानला मी आधी एक-दोनदा भेटले होते. त्यामुळे मी त्याला ओळखत होते. आणि हेच कारण होतं त्याच्याकडून आमंत्रण मिळाल्यावर मी त्या बर्थ डे पार्टीला जाणं. तिथे मी खुप वेगवेगळ्या निर्माता-दिग्दर्शकांना भेटले. माझ्यासाठी ही चांगली गोष्ट होती. मला खूप गोष्टी कळल्या. ती सगळीच चांगली लोकं होती. सलमान खूप चांगला माणूस आहे,चांगला मित्र आहे. केवळ त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित असल्यामुळे त्याच्यासोबत माझं नाव जोडणं चुकीचं आहे. मग तर मी ऋतिकलाही भेटले होते मग त्याच्यासोबत माझं नाव का जोडलं गेलं नाही. लोकांनी जे नातं नाही त्यावर बोलण्यात उगाच वेळ घालवू नये''. सामंथाच्या या स्पष्टीकरणामुळे आता अफवा पसरविणा-यांना थोडीशी का होईना पण उसंत मिळेल म्हणायची.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top