
१५ दिवसांपासून सोशल मीडियावरनं गायब आहे समंथा,चाहत्यांनी केली कारणांची यादी
टॉलीवूड अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला(Samantha Ruth Prabhu) सोशल मीडियाचं 'बटरफ्लाय' म्हटलं जातं. ती आपल्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना नेहमीच अपडेट देत असते,आणि त्यांचे मनोरंजन देखील करत असते. पण गेल्या १५ दिवसांपासून अभिनेत्री सोशल मीडियावरनं गायब झाल्याचं दिसत आहे. ३० जून नंतर समंथा रुथ प्रभूने कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या मनाची मात्र घालमेल होत आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्रीसोबत सगळं ठीक तर सुरु आहे ना अशी चिंता समंथाच्या चाहत्यांना भेडसावत आहे. (Samantha Ruth Prabhu is missing from social media for 15 days)
हेही वाचा: साई पल्लवी बॉलीवूडची फॅन; ऐश्वर्या,दीपिकाच्या सिनेमांची नावं घेत म्हणाली...
समंथाचे चाहते ती सोशल मीडियावरनं चक्क १५ दिवस गायब झाल्यामुळे चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. समंथा तिच्या कुठल्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेल्या १५ दिवसांपासून सक्रिय दिसली नाही. सगळ्यांना खूप चांगलं माहित आहे की जेव्हा समंथा तिच्या आयुष्यातील अतिशय कठीण दिवसांचा सामना करत होती तेव्हा देखील ती सोशल मीडियावर सक्रिय पहायला मिळाली होती. नागा चैतन्यसोबत तिनं जेव्हा घटस्फोटाची घोषणा केली तेव्हा देखील आपल्या चाहत्यांना ती सगळ्या अपडेट देताना दिसली.
हेही वाचा: 'आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूटिंग? कसं शक्य?', डॉ.अमोल कोल्हे पोस्ट चर्चेत
म्हणूनच जेव्हापासून समंथा सोशल मीडियावर दिसेनाशी झाली तेव्हापासून चाहते चिंतेत आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की,समंथाची मानसिक स्थिती ठीक आहे का? कितीतरी लोकांचे म्हणणे आहे की समंथा सोशल मीडिया डिटॉक्सवर गेली आहे. तर काही म्हणत आहेत की,समंथा सध्या आपल्या चाहत्यांसोबत किंवा फॉलोअर्ससोबत बोलण्याच्या मनःस्थितीत नाहीय. कदाचित काही वैयक्तिक कारण असेल.
Web Title: Samantha Ruth Prabhu Is Missing From Social Media For 15
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..