अखेर समंथानच्या घटस्फोटाचं कारण आलं समोर, ‘कॉफी विथ करण’मध्ये केला खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samantha Ruth Prabhu shares reason of 'unhappy marriages' after divorce

अखेर समंथानच्या घटस्फोटाचं कारण आलं समोर, ‘कॉफी विथ करण’मध्ये केला खुलासा

Koffee With Karan 7 : ज्या शो ची सर्वाधिक चर्चा आहे असा 'कॉफी विथ कारण' हा कार्यक्रम लवकरच आपल्या भेटीला येत आहे. येत्या 7 जुलै रोजी हा शो प्रदर्शित होणार आहे. पण कार्यक्रमाचा एक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ज्यामध्ये अनेक कलाकारांनी आपल्या आयुष्याची रहस्यं उलगडली आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती समंथा रूथ प्रभूची. कारण समंथाच्या घटस्फोटानंतर तिने त्याविषयावर कायमच बोलणे टाळले होते. पण 'कॉफी विथ करण'मध्ये मात्र तिने आपल्या मन की बात बोलून दाखवली. (Samantha Ruth Prabhu shares reason of 'unhappy marriages' after divorce in koffee with karan)

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिने आपल्या अभिनयाने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीच नाही तर बॉलीवुडलाही वेड लावलं आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा घटस्फोट झाला. समंथा आणि नागा चैतन्य यांची जोडी बेस्ट कपल म्हणून नावाजली जायची. पण त्यांच्या घटस्फोटाने अनेकांना धक्का बसला. त्या दोघांनीही घटस्फोटानंतर त्याविषयी बोलणे टाळले. पण कॉफी विथ करणमध्ये, वैवाहिक आयुष्य निराशाजनक असल्याचे समंथा म्हणाली.

'आपल्या दुःखी वैवाहिक जीवनाचे कारण आपणच असतो. आपण आयुष्याला K3G (कभी खुशी कभी गम) समजतो, पण खरे आयुष्य 'KGF' सारखे आहे.’ असे समंथा म्हणाली. समंथाच्या या विधानावर बोलणे ऐकून करणही हसला. घटस्फोटाची घोषणा केल्यापासून, समंथा याविषयी कधीही उघडपणे बोलली नाही पण यावेळी तिने अत्यंत सूचकपणे घटस्फोटाविषयी भाष्य केले. करणच्या या शो मध्ये, अनन्या पांडे, सारा खान, कतरिना, विकी कौशल, आलिया भट्ट, अक्षय कुमार यासारखे दिग्गज कलाकारही या पर्वात सहभागी होणार आहेत.

Web Title: Samantha Ruth Prabhu Shares Reason Of Unhappy Marriages After Divorce In Koffee With Karan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top