Samantha Cryptic Note: गेले ६ महिने अत्यंत वेदनादायी, समंथाच्या पोस्टने चाहत्यांना काळजी

समंथाने सोशल मिडीयावर एक पोस्ट केलीय ज्यामुळे तिच्या चाहत्यांना काळजी लागुन राहीली आहे.
Samantha Ruth Prabhu shares that the last six months were hard on her; Details Inside
Samantha Ruth Prabhu shares that the last six months were hard on her; Details InsideSAKAL

Samantha Cryptic Note News: साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा प्रेक्षकांच्या आवडीची अभिनेत्री. काही दिवसांपुर्वी सामंथाचा 'शाकुंतलम' चित्रपट रिलीज झाला.

'शाकुंतलम' फ्लॉप झाला पण त्यातील सामंथाच्या अभिनयाचं कौतुक झालं. सामंथाचे जगभर फॅन फॉलोईंग आहेत.

सामंथाने नुकतंच ती अभिनय क्षेत्रातुन ब्रेक घेणार असं सांगीतलं. आता समंथाने सोशल मिडीयावर एक पोस्ट केलीय ज्यामुळे तिच्या चाहत्यांना काळजी लागुन राहीली आहे.

(Samantha Ruth Prabhu shares that the last six months were hard on her; Details Inside)

Samantha Ruth Prabhu shares that the last six months were hard on her; Details Inside
Adipurush Leak Online: आधीच फ्लॉप, त्यात करोडोंचा फटका, आदिपुरुष यु ट्यूबवर लीक झाला

सामंथा रुथ प्रभूने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले. सामंथाने तिचा हसतमुख सेल्फी शेअर केला आणि त्यासोबत तिने लिहिले की, तिला गेल्या काही महिन्यांपासून खूप कठीण काळातुन जावं लागतंय. सर्वात लांब आणि सर्वात वेदनादायी सहा महिने आहेत.

पण यासोबतच सामंथाने एक सकारात्मक पोस्ट सुद्धा लिहीली आहे. तिच्यावर खूप कठीण वेळ आली असली तरी आता तिने त्या कठीण काळाचा शेवट केला आहे.

तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सामंथाने लिहिले, "सर्वात प्रदीर्घ आणि सर्वात कठीण सहा महिने गेले आहेत... पण आता या वेदनादायी काळाचा शेवट होतोय."

सामंथाने अलीकडेच ती एक वर्षाचा ब्रेक घेणार असं जाहीर केलं होतं. याशिवाय तिने कोणत्याही नवीन प्रोजेक्टची ऑफर स्वीकारली नाही. सामंथा नेहमीप्रमाणे धमाकेदार कमबॅक करेल, अशी तिच्या फॅन्सना आशा आहे.

काही महिन्यांपुर्वा समंथाच्या एका फोटोने काही लोक हैराण झाले आहेत. सामंथाचा हॉस्पिटलमधला एक फोटो पाहून लोक अस्वस्थ झाले आहेत.

सामंथाला काय झाले या विचाराने लोकांना चिंता वाटू लागली होती. पण एका थेरपी दरम्यानचा अभिनेत्रीचा हा फोटो व्हायरल झाला होता. ऑटोइम्यूनसाठी ‘हायपरबेरिक थेरपी’ दरम्यान तिने तो फोटो काढला होता.


समंथाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘शकुंतलम’ सिनेमाच्या पराभवानंतर ती आगामी वेब सीरिज ‘सिटाडेल’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. राज आणि डीके या सीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. या सीरिजमध्ये सामंथा आणि वरुण धवन पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com