esakal | आदिवासी समाजावर वादग्रस्त वक्तव्य, संभावनाला पडलं महागात
sakal

बोलून बातमी शोधा

sambhavana seth

आदिवासी समाजावर वादग्रस्त वक्तव्य, संभावनाला पडलं महागात

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉसमध्ये (sambhavana seth) चमकलेली स्पर्धक संभावना सेठ आता मोठ्या वादात सापडली आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं आदिवासी समाजाबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य. सोशल मीडियावर तिच्यावर नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे. त्यामुळे संभावनाला त्या समुहाची माफी मागावी लागली आहे. केवळ संभावना नाही तर अविनाश व्दिवेदी (avinash diwedi) हा देखील वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. संभावना आणि अविनाश हे दोघेही युट्युबवर आहे. आणि ते सोशल मीडियावर नेहमी गंमतीशीर व्हिडिओ शेयर करत असतात. (sambhavna seth and her husband apologise to adivasi community for hurting their sentiments)

संभावना आणि अविनाश यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेयर केला होता. त्यात आदिवासी समुहाची थट्टा करण्यात आली होती. त्यावर त्या समाजातील काहींनी आक्षेप घेतला. त्यामुळे हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले. आणि नेटकऱ्यांनी त्या दोघांवर शेलक्या शब्दांत टीका करण्यास सुरुवात केली आहे. 16 जून रोजी हा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. त्यात आदिवासी समुहाबदद्ल काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला होता.

त्या व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेल्या शब्दांमुळे संभावना आणि अविनाश यांना ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. जेव्हा त्याला निगेटिव्ह स्वरुपाच्या कमेंट मिळण्यास सुरुवात झाली तेव्हा त्याची चर्चा व्हायला लागली. त्यानंतर संभावना आणि अविनाश यांच्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर त्या दोघांनीही माफी मागितली आहे. आपल्या माफीनाम्यामध्ये ते म्हणतात....

आम्ही 16 जूनला एक व्हिडिओ तयार केला होता. मात्र त्यामध्ये आम्ही वापरलेली भाषा कुणा एखाद्याच्या भावना दुखावेल असे वाटले नव्हते. प्रत्यक्षात ती भाषा झारखंडमधील एका आदिवासी समुहाची असल्याचे कळले. त्यातून सोशल मीडियावर वादाला सुरुवात झाली. आम्हाला कोणत्याही समुह आणि समाज यांच्या भावना दुखावयाच्या नव्हत्या. त्या समुहातील एक लाखांहून अधिक लोकांच्या भावना आमच्यामुळे दुखावल्याची माहिती समोर आलीय. त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत.

हेही वाचा: अंकिताला घराबाहेर काढून अभिषेक करणार अनघाशी लग्न?;पाहा व्हिडिओ

त्या समाजाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्हाला लोकांचे मनोरंजन करायचे होते. कुठल्याही समाजातील भेदभाव सर्वांसमोर आणण्याचा विचार त्यामागे नव्हता. प्रेक्षकांनी या गोष्टीचाही विचार करावा. आम्ही आमच्या व्हिडिओसाठी कुठल्याही प्रकारची खास स्क्रिप्ट तयार करत नाही. प्रेक्षकांचे मनोरंजन करताना अनावधानं आमच्या तोंडून हे शब्द निघाले. या शब्दांत त्या दोघांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

loading image