
'मराठी माणसाचा अपमान राज्यपालच करत असतील तर...' समीर विद्वांसचा घणाघात..
Mumbai मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी माणसांना बाहेर काढलं तर मुंबई,ठाण्यात,आजुबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केलं आहे. पण त्यानंतर मात्र राजकीय गोटातून अनेक प्रतिक्रिया समोर येत असून राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी देखील जोर धरून आहे. अनेक राजकीय नेत्यांनी राज्यपालांच्या या वक्तव्यावर ट्वीट करत त्यांच्यावर टीका केली आहे. या दरम्यान आता मराठीतला प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यानं देखील राज्यापालांच्या बेताल वक्तव्यावर ट्वीट करत त्यांच्याविरोधात सूर काढला आहे.(Sameer Vidwans Tweet On Governor Bhagat Singh Koshyari Controversial Statement On mumbai)
समीर विद्वांस नेहमीच सामाजिक,राजकीय विषयांवर बोलताना दिसतो. तो आपली भूमिका अगदी स्पष्ट भाषेत मांडत असतो. आता देखील त्यानं राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ट्वीट करत म्हटलं आहे,''कधी सावित्रीमाईंबद्दल बेताल वक्तव्य करायचं तर कधी मराठी माणसाला हिणवायचं! का?! कशासाठी? मुंबई सगळ्यांना सामावून घेते, भेदभाव करत नाही त्या मुंबईचा आणि मराठी माणसाचा अपमान राज्यपालच करत असतील तर काय बोलायचं?!''
दुर्दैव दुसरं काय!
हेही वाचा: प्रसिद्ध पॉप गायिका शकीराला अटक होण्याची शक्यता, करोडोंची फसवणूक केल्याचा आरोप
राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा 'आनंदी गोपाळ'चा दिग्दर्शक समीर नेहमीच आपल्या सिनेमांच्या माध्यमातूनही सामाजिक विषयांवर भूमिका मांडताना दिसतो. राज्यपालांच्या वक्तव्यावर त्यानं केलेलं ट्वीट देखील चर्चेत आलं आहे. लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहेत.
Web Title: Sameer Vidwans Tweet On Governor Bhagat Singh Koshyari Controversial Statement On Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..