Sameer Wankhede : समीर वानखेडेंची केतन तिरोडकर विरोधात अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार

वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणाचा तपास करताना भ्रष्टाचार केल्याचे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले आहे.
Sameer Wankhede Case Updates
Sameer Wankhede Case Updates

Sameer Wankhede Case Updates : NCB चे माजी अधिकारी समिर वानखेडें यांनी केतन तिरोडकर विरोधात अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची बातमी समोर आली आहे. यापूर्वी तिरोडकर यांनी वानखेडे यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता वानखेडे यांनी बदनामी केल्याप्रकरणी तिरोडकरांच्या विरोधात पोलिसांकडे धाव घेतली आहे.

एका वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया देताना तिरोडकर यांनी वानखडेंवर केले गंभीर आरोप केल्याचे दिसून आले होते. यानंतर येत्या काळात तिरोडकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून वानखेडे यांच्यावर आर्यन खान प्रकरण आणि त्या प्रकरणाचा तपासात कसूर केल्याबाबतचे वेगवेगळे आरोप ठेवण्यात आले आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणाचा तपास करताना भ्रष्टाचार केल्याचे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यात कोर्टानं अनेक निरीक्षणं याप्रकरणात नोंदवली आहेत. कार्डिलिया क्रूझ प्रकरणात वानखडेंनी एका न्यायाधिशांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याजवळ ड्रग्ज सापडलं मात्र त्याला वानखेडेंनी सोडले. अशी प्रतिक्रिया तिरोडकर यांनी एक वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया दिली होती.

Sameer Wankhede Case Updates
Sameer Wankhede Case: समीर वानखेडे प्रकरणाला वेगळं वळण, आता CBI ने या अभिनेत्रीला पाठवलं समन्स

त्या प्रतिक्रियेवर आक्षेप घेत वानखेडे यांनी तिरोडकर यांनी दिलेली प्रतिक्रिया चुकीची व खोटी असल्याचा आरोप केला होता. आता वानखेडेंनी अंबोली पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली असून तिरोडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वानखेडेंनी केली आहे.

वानखेडे यांच्या प्रकरणाविषयी सांगायचे झाल्यास त्यांच्यावर आर्यन खानला सोडवण्यासाठी २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अशातच या सर्व प्रकरणात अभिनेत्री मुनमुन धमीचाला समन्स पाठवण्यात आलं आहे. आर्यन खानला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी NCB प्रमुख समीर वानखेडेंनी अटक केली होती. त्यानंतर आर्यनची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com