
Sameera Reddy Birthday: तो म्हणाला, तुझ्यात मजा नाही.. काय आहे समीरा रेड्डीचं हे प्रकारण?
एकेकाळी जिने बॉलीवुड गाजवलं, प्रेक्षकांना भुरळ घातली अशी अभिनेत्री म्हणजे समीरा रेड्डी.. आज तिचा वाढदिवस. समीरासाठीही तिचं करियर सोप्पं नव्हतं. अनेकदा तिला रिजेक्ट देखील केले गेले आहे. मनोरंजन सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत असताना एकदा तिला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव आला, यावेळी तिच्यावर अश्लील कमेंट करण्यात आली होती. जाणून घेऊया नेमका काय आहे हा प्रकार..
हेही वाचा: Har Har Mahadev: 'हर हर महादेव' दाखवू नका.. अखेरचा इशारा! 'झी' विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक
समीराने आई झाल्यानंतर अभिनयाकडे पाठ फिरवली. मात्र ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या कुकिंग व्हिडिओ देखील प्रचंड लोकप्रिय आहेत. पण एक काळ असा होता की समीराला कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, 'मी एक चित्रपट करत होते.. पण मला अचानक सांगण्यात आले की तुला या चित्रपट किसिंग सीन द्यायचा आहे. मात्र जेव्हा बोलणी झाली तेव्हा असा सीनच चित्रपटात नव्हता.'
पुढे ती म्हणाली, मला हे पटत नव्हते म्हणून विरोध केला. त्यावर निर्माते मला म्हणाले 'तू आधी मुसाफिर चित्रपटात असा सीन दिला आहेस यात द्यायला हरकत काय?' त्यावर मी म्हंटले की, 'मी आधी असा सीन दिला म्हणजे प्रत्येक चित्रपटात देईन असा अर्थ होत नाही. तेव्हा मला सांगण्यात आले की, 'तू यावर नीट विचार कर.. आमच्याकडे दूसरा कलाकारही तयार आहे.'
तर एका अभिनेत्याने तर थेट तिच्यावर अश्लील कमेंट केली होती. 'तू कंटाळवाणी आहेस, तुझ्यात मजा नाही, त्यामुळे मी तुझ्याबरोबर पुढे काम करेन की नाही माहित नाही' असे तो समीराला म्हणाला होता.