Video: प्रेग्नेंट समीरा रेड्डीनं जेव्हा बिकिनी घालून केलं होतं अंडरवॉटर शूट... Sameera Reddy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sameera Reddy Underwater Pregnancy photoshoot

Video: प्रेग्नेंट समीरा रेड्डीनं जेव्हा बिकिनी घालून केलं होतं अंडरवॉटर शूट...

Sameera Reddy Underwater Pregnancy photoshoot: बॉलीवूड अभिनेत्री(Bollywood Actress) नेहमीच प्रेग्नेंसी दरम्यान बेबी बंप दाखवण्याच्या बाबतीत बिनधास्त राहिल्या आहेत. सोनम कपूर,आलिया भट्ट,बिपाशा बासू सगळ्यांनीच प्रेग्नेंट राहिल्यावर बेबी बम्प फ्लॉन्ट केलेलं आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल. सोनम कपूरला तर तिनं प्रेग्नेंसी दरम्यान केलेल्या फोटोशूटवरनं ट्रोलही केलं गेलं होतं. तर लिझा हेडन देखील तीन प्रेग्नेंसीज आणि त्या दरम्यान क्लीक केलेल्या हॉट फोटोशूटवरनं चर्चेत आली होती. पण एक अभिनेत्री अशी देखील आहे,जिनं प्रेग्नेंसी दरम्यान खास फोटोशूट केलं होतं,जे आता समोर आलं आहे आणि ते पाहिल्यावर सगळेच थक्क झाले आहेत. एकदम बोल्ड अंदाजात प्रेग्नेंसीमध्ये फोटोशूट केलेली ही अभिनेत्री आहे समीरा रेड्डी.(Sameera Reddy Underwater Pregnancy photoshoot)

हेही वाचा: Boycott Vikram Vedha: 'या' 5 कारणांनी लोक 'विक्रम वेधावर' घालतायत बहिष्कार

समीरा रेड्डी 'सैसी सासू और मैसी मम्मा' या व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत पहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच तिनं आपल्या पहिल्या डिलीव्हरी दरम्यानच्या शारिरीक त्रासाविषयी मोठा खुलासा केला होता. समीरा म्हणाली होती की,''जे बाळ मला हवंय, तो आनंद मला हवा आहे त्यासाठी देखील खुश होताना मला खूप त्रास होत होता. पहिल्या मुलाच्या जन्मानंतर शरीरात आंतरिक झालेले बदल,ज्याला आपण वैज्ञानिक भाषेत हार्मोनल चेन्जेस म्हणतो त्यामुळे अचानक मूड चेन्ज व्हायचा. याचा खूप त्रास सहन केलाय मी. समीराने जेव्हा आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता,तेव्हा ती डिप्रेशनचा सामना करत होती. ज्यामुळे ती आपल्या मुलाचा जन्म झाल्यावर तो आनंद देखील मनापासून अनुभवू शकत नव्हती''.

समीरा रेड्डा एकदम बिनधास्त स्वभावाची आहे. कोणत्याही गोष्टीला जर करायचं असेल तर ती त्याचा फार विचार करत नाही. असंच काहीसं तिनं तेव्हा केलं जेव्हा ती दुसऱ्या बाळाच्या वेळेस प्रेग्नेंट होती. समीरानं बेबी बंप सोबत एक फोटोशूट केलं होतं,जे पाहून सगळेच थक्क झाले होते. समीराने अंडर वॉटर प्रेग्नेंसी शूट करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. हे फोटोशूट तिनं २०१९ साली केलेलं होतं. वेगवेगळ्या बिकिनीत समीरा पाण्याच्या तळाशी जाऊन फोटोशूट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ अनेक फोटोंना एकत्र करुन बनवला गेला आहे. समीरानं या पोस्टच्या माध्यमातून सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा: 'गॅंग्ज ऑफ वासेपुर'च्या अभिनेत्या विरोधात FIR, आरोपांची यादी एकदा वाचाच...

समीरानं या पोस्टला शेअर करत लिहिलं आहे की,''मी याआधी स्वतःला इतक्या सुंदर रुपात कधीच पाहिलं नव्हतं. कधीच कोणाला तुम्हाला कमी लेखू देऊ नका''. समीरानं ती पोस्ट आपल्या पतीला टॅग करत लिहिलं आहे की,''तु मला आयुष्यातील खुप सुंदर आणि मौल्यवान आठवणी दिल्या आहेस. आई बनणाऱ्या सर्व महिलांना माझं एकच सांगण,लाजू नका. आपल्यातील बदलाला एन्जॉय करा,आनंदी राहायला शिका''. समीराच्या या बिनधास्त फोटोशूटची सगळ्यांनीच प्रशंसा केली. तिचे चाहते तर तिच्यावर कमेंट्सच्या माध्यमातून कौतूकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

Web Title: Sameera Reddy Underwater Pregnancy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..