esakal | 'माहिती नसताना वाटेल ते गैरसमज करून घेऊ नका'; समीर चौघुलेंचं नेटकऱ्याला उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Samir Choughule

'माहिती नसताना वाटेल ते गैरसमज करून घेऊ नका'; समीर चौघुलेंचं नेटकऱ्याला उत्तर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'महाराष्ट्राची हास्य जत्रा' Maharashtrachi Hasya Jatra या कॉमेडी शोमुळे अभिनेते समीर चौघुले Samir Choughule यांना भरपूर लोकप्रियता मिळाली. समीर हे सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असून त्यांनी शोचा नवीन प्रोमो नुकताच चाहत्यांसोबत शेअर केला. या प्रोमोमध्ये वनिता खरात, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार आणि इतर अभिनेते, कॉमेडियन पहायला मिळाले. मात्र प्रभाकर मोरे या प्रोमोमध्ये दिसले नाहीत. प्रभाकर मोरे यांना प्रोमोमध्ये का नाही घेतलं, असा प्रश्न एका नेटकऱ्याने समीर चौघुलेंना विचारला. त्यावर समीर यांनी तिला उत्तर दिलं आहे.

'समीर सर, हे चुकीचं आहे. तुम्ही सगळे आहात प्रोमोमध्ये आणि प्रभाकर मोरे नाहीत. ते पण दिग्गज आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांना का नाही घेतलं प्रोमोमध्ये? हे बरोबर नाही,' असं संबंधित नेटकऱ्याने लिहिलं. त्यावर समीर यांनी उत्तर दिलं, 'दादा.. सर.. ते गावाला पर्सनल कामानिमित्ताने गेले होते. कृपया माहिती नसताना वाटेल ते गैरसमज करून घेऊ नका आणि पसरवू नका.'

हेही वाचा: अभिनेत्री आसावरी जोशीचा अपघात? जाणून घ्या सत्य..

'महाराष्ट्राची हास्य जत्रा' हा कार्यक्रम आठवड्यातून दोन दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. आता येत्या २० सप्टेंबरपासून हा शो आठवड्यातून चार दिवस प्रसारित केला जाणार आहे. 'कोण होणार करोडपती' हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

loading image
go to top