Hijab: 'याच कारणानं मी हिजाबचा स्विकार केला', अखेर सना खानने सोडलं मौन Sana Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sana Khan reveals she chose to wear hijab after depression

Hijab: 'याच कारणानं मी हिजाबचा स्विकार केला', अखेर सना खानने सोडलं मौन

हॉट,ग्लॅमरस अशी विशेषणं जिच्या नावाच्या आधी लागायची त्या सना खानने(Sana Khan) अचानक बॉलीवूडला ठोकलेला रामराम अनेकांच्या पचनी पडला नव्हता. तिनं अचानक हिजाबचा(Hijab) स्विकार केला ही तर सगळ्यांसाठी धक्का देणारीच गोष्ट होती. पण यावर सनानं याआधी कधीच काही स्पष्टपणे वक्तव्य केलं नव्हतं. 2020 मध्ये तिने अचानक सिनेइंडस्ट्री सोडली. तिनं अनद सईद नामक व्यावसायिकासोबत लग्न केलं आणि धार्मिक मार्ग स्विकारला. आता दोन वर्षानंतर सना खानने आपण हिजाबचा स्विकार का केला यावर चुप्पी तोडली आहे. अभिनेत्रीनं एक व्हिडीओ शेअर करत त्यामध्ये आपण आपली लाइफस्टाईल का बदलली, का हिजाब घालायला सुरुवात केली आणि सिनेमांना का रामराम केला या सगळ्यांची त्यात उत्तरं दिली आहेत.(Sana Khan reveals she chose to wear hijab after depression)

हेही वाचा: Shivam Sharma चे आईच्या मैत्रिणीसोबतच होते संबंध, पास्ता घेऊन जायचा आणि...

व्हिडीओत सना खान काळ्या रंगाच्या बुरख्यात दिसत आहे. ती म्हणतेय,''माझ्या याआधीच्या आयुष्यात निश्चितच माझ्याकडे सगळं होतं. नाव,पैसा,सगळं होतं. मी ते सगळं करु शकत होते जे मला करायचं होतं. पण तरीदेखील एका गोष्टीची कमी होती. माझ्या मनाला समाधान मिळत नव्हतं ना शांतता. मी विचार करायची,माझ्याकडे सगळं काही आहे,पण तरी मी खूश का नाही? ते खूपच कठीण होतं समजून घेणं माझ्यासाठी,मी काही दिवस त्या कारणाने डिप्रेशनचा देखील अनुभव घेतला आहे. तेव्हा मला देवानेच संकेत दिले,त्यानंच मला पुढचा मार्ग सांगितला''.

सना खानने २०१९ मधील एका व्हिडीओत एक उल्लेख केला होता. ती म्हणाली आहे,''२०१९ मध्ये तो रमजानचा महिना होता. मला माझ्या स्वप्नात माझी कब्र दिसली. मला जळणारी कब्र दिसली होती,ज्यामध्ये मी होते. ती कब्र खाली नव्हती. मी स्वतःला त्यात पाहिलं. मला वाटलं हे देवानेच संकेत दिले आहेत, तो जणू म्हणत आहे, जर मी बदलले नाही तर माझा अंत असा होईल. आणि मी त्यामुळे खूपच चिंतेत पडले''.

सना खान पुढे म्हणाली आहे,''मला आजही तो बदल लक्षात आहे,जो त्यावेळी माझ्यात होत होता. मी ईस्लामविषयक प्रोत्साहन देणारी,आवड निर्माण करणारी भाषणं ऐकायची. एका रात्री मी खूप सुंदर काहीतरी वाचलं होतं. त्यामध्ये एक संदेश होता की,तुम्हाला नक्कीच असं वाटतं नसेल की तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस तुमचा हिजाब घालण्याचा पहिला दिवस असावा. या वाक्यानं थेट माझ्या अंतःकरणाला स्पर्श केला. मी रडायला लागले. दुसऱ्यादिवशी सकाळी उठले,तो माझा वाढदिवसाचा दिवस होता. मी आधी देखील खूप स्कार्फ खरेदी केले होते. पण त्यादिवशी मी स्कार्फ हिजाब पद्धतीनं बांधला,आणि स्वतःशी म्हटलं की आता मी याला कधीच हटवणार नाही''.

सना खान आपला पती अनन सईद सोबत हज यात्रेला गेली होती. या यात्रेवरुन परतल्यावर ती खूपच खूश आहे असं देखील म्हणाली आहे. ती म्हणाली आहे, मला आनंद आहे की मी खूप बदलली आहे. आता मी पुन्हा मागे जाणार नाही. आता मी हिजाब कधीच हटवणार नाही.

Web Title: Sana Khan Reveals She Chose To Wear Hijab After

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..