नाट्यपरिषदेच्या माध्यमातून नाट्य चळवळीला नवी ऊर्जा देऊ - डॉ गिरीश ओक

संतोष भिसे
शुक्रवार, 4 मे 2018

मिरज - नाट्यपरिषदेच्या माध्यामातून नाट्य चळवळीला नवी ऊर्जा देऊ, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गिरीश ओक यांनी केले.

मिरज - नाट्यपरिषदेच्या माध्यामातून नाट्य चळवळीला नवी ऊर्जा देऊ, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गिरीश ओक यांनी केले.

मिरजेतील नाट्य प्रेमींच्यावतीने आयोजित केलेल्या सदिच्छा भेटीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले,  नाट्य चळवळ जिवंत ठेवण्याचे आणि त्याला नवी दिशा व कल्पना देण्याचे कामसुद्धा नाट्य परिषद करेल. नाट्य संमेलन तसेच राज्य नाटय़स्पर्धा यामध्ये त्रुटी असतील तर त्यातही सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहू. मिरजेतील नाट्यप्रेमींनी मिरजेचा नावलौकिक वाढावा. यासाठी नवनवीन प्रयोग करून पहावेत. शासनाच्या मदतीवर विसंबून न राहता क्रियाशील प्रयत्न सातत्याने करत रहा; नाट्यपरिषद यासाठी नेहमी सकारात्मक प्रतिसाद देईल.

डॉ. गिरीश ओक यांचा सत्कार प्रा. राम कुलकर्णी व प्रा. भीमराव धुळूबुळू यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक ओंकार शुक्ल यांनी केले. मिरजेच्या नाट्य चळवळीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन बाळ बरगाले यांनी केले. मुकुंद पटवर्धन, प्रशांत गोखले, दिगंबर कुलकर्णी, विनायक इंगळे, कविता घारे, चंद्रकांत देशपांडे, विकास कुलकर्णी, संजय भोसले, राजेंद्र सव्वाशे, नितीन देशमाने, ऋषिकेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli News Girish Oak comment

टॅग्स