संग्राम साळवी-खुशबू तावडेला पुत्ररत्न; मुलाचं नाव ठेवलं... | Sangram Salvi Khushboo Tawde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangram Salvi and Khushboo Tawde

संग्राम साळवी-खुशबू तावडेला पुत्ररत्न; मुलाचं नाव ठेवलं...

अभिनेत्री खुशबू तावडे Khushboo Tawde आणि अभिनेता संग्राम साळवी Sangram Salvi यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. खुशबूने मुलाला जन्म दिला असून सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली. संग्रामने पोस्ट केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने मुलाचं नावसुद्धा सांगितलं आहे. '२-११-२१ राघव', असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. २ नोव्हेंबर रोजी खुशबू आणि संग्रामच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं.

या फोटोवर संग्राम-खुशबूचे इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 'देवयानी' या मालिकेमुळे संग्राम घराघरात पोहोचला. याशिवाय त्याने 'आई माझी काळूबाई', 'गुलमोहर', 'सूर राहू दे' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. सध्या तो 'कन्यादान' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तर खुशबूने 'तेरे बिन', 'मेरे साई', 'आम्ही दोघी' अशा मालिकांमध्ये काम केलंय. खुशबू आणि संग्रामने ५ मार्च २०१८ रोजी लग्नगाठ बांधली.

रश्मी अनपट, गौरी नलावडे, मंगेश बोरगावकर, ऋतुजा बागवे, धनश्री कडगावकर, गिरीजा प्रभू, वीण जगताप आणि इतरही काही सेलिब्रिटींनी खुशबू आणि संग्रामला शुभेच्छा दिल्या आहेत.

loading image
go to top