केजीएफचा दुसरा भाग लवकरच पडद्यावर; संजय दत्त महत्वाच्या भूमिकेत

वृत्तसेवा
Sunday, 22 December 2019

पुन्हा साम्राज्य निर्माण करणं सोप्प नाही, असं इंग्रजीमध्ये म्हणत संजय दत्तने केजीएफ चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच पडद्यावर येणार असल्याचे सांगितले आहे. संजय दत्तने आपल्या ट्विटरवरून चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर केला आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या तुफान यशानंतर दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मुंबई : पुन्हा साम्राज्य निर्माण करणं सोप्प नाही, असं इंग्रजीमध्ये म्हणत संजय दत्तने केजीएफ चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच पडद्यावर येणार असल्याचे सांगितले आहे. संजय दत्तने आपल्या ट्विटरवरून चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर केला आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या तुफान यशानंतर दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केजीएफ चॅप्टर 1 हा दाक्षिणात्य चित्रपटांपैकी एक चांगला चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाने केवळ पहिल्या तीन आठवड्यात जवळपास २५० कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे नाव केजीएफ चॅप्टर 2 असे आहे. केजीएफ 1 चा हा सिक्वल असणार आहे. 

तर माझा पुतळा जाळा, पण... : पंतप्रधान मोदी

सुपरस्टार यशने या चित्रपटात नायकाची भूमिका साकारली होती. दुसऱ्या भागातही तोच नायकाची भूमिका साकारणार असून संजय दत्त हा महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्तने या चित्रपुटाचं पोस्टर शेअर करण्यापूर्वीही सिनेमातील त्याचा लुक इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. संजय दत्तने शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये अभिनेता यश निळ्या शर्टमध्ये आणि काळ्या रंगाच्या पॅन्टमध्ये दिसत आहे. तो इतर कामगारांबरोबर एक भलामोठा लाकडाचा ओंडका ओढताना दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Dutt the first look KGF: Chapter 2 on his social media!