Sanjay Dutt Accident: 'डबल आयस्मार्ट'च्या शूटिंगदरम्यान संजय दत्तचा मोठा अपघात! डोक्याला पडले टाके

संजय दत्तच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. 'डबल स्मार्ट' चित्रपटाच्या सेटवर तो जखमी झाला.
Sanjay Dutt Accident:
Sanjay Dutt Accident:Esakal

Accident On Set of Double Ismart: बॉलिवूड स्टार संजय दत्तच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संजय दत्त सध्या साउथ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच्या आगामी 'डबल आयस्मार्ट' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजय दत्तचा अपघात झाला आहे. या चित्रपटाच्या सेटवर तो जखमी झाला. त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या डोक्याला टाके पडले आहे.

Sanjay Dutt Accident:
Gadar 2 Box Office Day 5: स्वातंत्र्यदिनी गदर 2 सुसाट! सगळे रेकॉर्ड मोडत केली 'इतक्या' कोटींची कमाई...

संजय दत्तच्या आगामी 'डबल आस्मार्ट' चित्रपटाची शुटिंग बँकॉकमध्ये सुरु आहे. तलवारबाजीच्या सीनचा शुट करतांना संजय दत्त जखमी झाला होता.

दुखापतीनंतर काही वेळातच संजय दत्त पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याच्या दुखापतीचा कामावर काही परिणाम न होऊ देता त्याने चित्रपटाचे शुट पुर्ण केले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती आता संजय दत्त पुर्णपणे बरा आहे.

Sanjay Dutt Accident:
Ukrainian singer Uma Shanti: प्रसिद्ध गायिकेवर पुण्यात गुन्हा दाखल ! काय आहे नेमकं प्रकरण

डबल स्मार्ट' पुरी जगन्नाध यांनी दिग्दर्शित केला आहे. यात संजय तेलगू अभिनेता राम पोथिनेनीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करत आहे.

संजय दत्त याने 'KGF: Chapter 2' द्वारे तेलुगु चित्रपटात पदार्पण केले आहे आणि हे त्याचे कन्नड पदार्पण आहे.

यापूर्वी संजयने 'डबल iSmart' मधील त्याच्या पहिला लूक शेअर केला होता. संजय त्याच्या आगामी 'लिओ' चित्रपटाद्वारे तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. (Latest Marathi News)

Sanjay Dutt Accident:
OMG 2 Box Office Collection day 5: गदर2 ला चांगलाच नडतोय OMG2 ! रिलिजच्या पाचव्या दिवशी केली बक्कळ कमाई...

ज्यामध्ये तो तमिळ सुपरस्टार थलपथी विजय आणि त्रिशा यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे. त्याचबरोबर संजय दत्त 'घुडचड', 'बाप', 'द गुड महाराज'  आणि शाहरुख खानचा 'जवान' यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com