संजय दत्तला मिळाला UAE चा गोल्डन व्हिसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Dutt

संजय दत्तला मिळाला UAE चा गोल्डन व्हिसा

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने Sanjay Dutt बुधवारी गोल्डन व्हिसा Golden Visa दिल्याबद्दल संयुक्त अरब अमिरातीचे UAE आभार मानले. संजय दत्तने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर फोटो पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. संयुक्त अरब अमिरातीने घातलेल्या प्रवासी निर्बंधांनुसार संजय दत्तला गोल्डन व्हिसा मिळाला आहे. त्याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये जीडीआरएएफ दुबईचे व्यवस्थापकीय संचालक मेजर जनरल मोहम्मद अल मर्री यांच्याकडून गोल्डन व्हिसा स्विकारताना संजय दत्त दिसत आहे. 'युएई सरकारचे खूप आभार आणि फ्लाय दुबईचे सीओओ हमद ओबैदल्ला यांचेही आभार', असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलंय. (Sanjay Dutt receives UAE golden visa)

संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान आणि दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये व्यावसायिकांना दहा वर्षांचा गोल्डन व्हिसा देण्याची मान्यता दिली होती. संजय दत्त कामानिमित्त दुबईला ये-जा करत असतो. यावर्षीचा ईददेखील त्याने कुटुंबीयांसह दुबईत साजरा केला होता. गेल्या काही दिवसांपासून तो तिथेच राहत आहे. त्याला मिळालेला गोल्डन व्हिसा हा दहा वर्षांच्या कालावधीचा आहे.

हेही वाचा: 'मला त्या "आदित्य"ला धडा शिकवायचाय'; संजय मोने यांची आगपाखड

संजय दत्तच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, त्याचा 'तोरबाज' हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता 'केजीएफ : चाप्टर २', 'शमशेरा', 'पृथ्वीराज' आणि 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटांमध्ये तो झळकणार आहे.

टॅग्स :UAEsanjay dutt