Prasthanam : संजूबाबाच्या प्रस्थानमचा टीझर रिलीज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

- बाबा या मराठी चित्रपाटाचा निर्माता म्हणून तर केजीएफ चॅप्टर 2 या चित्रपटात खलनायक म्हणून चर्चेत असणारा संजय दत्त आता अजुन एका चित्रपटासाठी चर्चेत आला आहे.

- 'प्रस्थानम' या संजय दत्त प्रोडक्शनच्या सिनामाचा टीझर कालच रिलीझ करण्यात आला. 

बाबा या मराठी चित्रपाटाचा निर्माता म्हणून तर केजीएफ चॅप्टर 2 या चित्रपटात खलनायक म्हणून चर्चेत असणारा संजय दत्त आता अजुन एका चित्रपटासाठी चर्चेत आला आहे. 'प्रस्थानम' या संजय दत्त प्रोडक्शनच्या सिनामाचा टीझर कालच रिलीझ करण्यात आला. 

काल (ता.29) संजय दत्तचा साठावा वाढदिवस होता, आणि हा वाढदिवस संजय दत्तसाठी फार खास ठरला. काल केजीएफ चॅप्टर 2 मधील त्याचा लूक सोशल मिडियावर शेअर करण्या आला. तसच काल 'प्रस्थानम' चा टिझर देखील रिलीझ झाला.

यात संजय दत्त एका राजकारण्याची भुमिका करताना आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त सोबत मनीषा कोईराला, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, अली फजल आणि अमयरा दस्तूर हे कलाकारही झळकणार आहे.

संजय दत्तचा टीझर मधला लूक आपल्याला वास्तव या चित्रपटाची हलकिशी आठवण करून देतो. टीझर मधील कॅनफ्लीकिट प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करणार यात वाद नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay dutt s prasthanam teaser released